Anil Jaisinghani - Amruta Fadnavis
Anil Jaisinghani - Amruta Fadnavis sarkarnama
मुंबई

Bookie Anil Jaisinghani Arrested : फडणवीस धमकी प्रकरणातील बुकी अनिल जयसिंघानीला अटक

सरकारनामा ब्युरो

Amruta Fadnavis Blackmail Case: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरात येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याचं प्रकरण नुकतेच समोर आलं होत. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला नुकतीच अटक करण्यात आली आहे.

अनिक्षाला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यानंतर या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार अनिल जयसिंघांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अनिल जयसिंघानी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्याही रडारवर होता. अनिल जयसिंहानी उल्हासनगरमध्ये क्रिकेट बुकी म्हणून काम करत होता. अहमदाबाद सेशन कोर्टानेही त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे. गुजरात इडीव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, आसाम, मध्यप्रदेशमध्येही त्याच्या शोध सुरु होता.

सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर गोवा पोलिसांनी 11 मे 2019 रोजी अनिल जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती.

आठ वर्षांपूर्वी 2015 मे मध्ये गुजरात ईडीने जयसिंहानी याच्या दोन घरांवर छापा मारला होता. त्याच्याविरोधात मनी लॉण्ड्रींग प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला. पण तब्येतीचं कारण देत तो फरार झाला. त्यानंतर मुंबईतल्या दोन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवूणीकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनिक्षा जयसिंघानी ही भारतातील सर्वात मोठे बुकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिल जयसिंघानी यांची कन्या आहेत. अमृता फडणवीस यांच्याशी त्यांची मागील पाच वर्षांपासूनची ओळख आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या चतुर्वेदी यांनी फडवीसांना गृहमंत्रीपदावरून बाजूला होऊन, या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची स्थापन करण्याची मागणी केली होती.

अनिक्षा जयसिंघानीला 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सेशन कोर्टानं अनिक्षाला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाबरोबर तिचे वडिल अनिल जयसिंहानी यांच्याविरोधाताही तक्रार दाखल केली आहे. अनिल जयसिंहानी हा ५ राज्यात वॉन्टेड आहे, इतकंच नाही तर ७ वर्षांपासून तो फरार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT