Mamata Banerjee : राहुल गांधी हेच मोदींचे सर्वात मोठे 'टीआरपी' ; ममता म्हणाल्या, "राहुल गांधींना 'हिरो'बनविण्याचा प्रयत्न.."

Mamata Banerjee ON Rahul gandhi face of opposition : राहुल गांधी हे विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा झाल्यास भाजपला त्यांचा फायदा होईल
Mamata Banerjee ON Rahul gandhi face of opposition
Mamata Banerjee ON Rahul gandhi face of opposition Sarkarnama

Mamata Banerjee ON Rahul gandhi face of opposition : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आज (सोमवारी) मुर्शिदाबाद येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ममता बॅनर्जी बोलत होत्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "राहुल गांधी हे जर विरोधीपक्षाचा प्रमुख चेहरा असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणे अवघड जाईल. राहुल गांधी हे मोदींचे सर्वात मोठे टीआरपी आहेत,"

"आपल्या स्वार्थांसाठी भाजप राहुल गांधी यांचा वापर करुन त्यांना 'हिरो'करण्याचा प्रयत्न करीत आहे. संसदेचे कामकाज भाजप होऊ देत नाही, कारण त्यांना वाटते की राहुल गांधी हे विरोधीपक्षनेता बनावे. राहुल गांधींना 'हिरो'बनविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Mamata Banerjee ON Rahul gandhi face of opposition
Third Front : काँग्रेसचं टेन्शन वाढलं ; BJPच्या विजयी रथाला हे आठ पक्ष रोखणार ; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरु

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काँग्रेस पक्ष नेहमीच भाजपसमोर झुकण्याचा प्रयत्न करतो.काँग्रेस, सीपीएम आणि भाजप हे अल्पसंख्यांकांना टीएमसीच्या विरोधात भडकविण्याचा काम करीत आहे," राहुल गांधी हे विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा झाल्यास भाजपला त्यांचा फायदा होईल, असे यापूर्वी टीएमसीचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढतच आहे. टीमसी हा पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यातील मतदारांना आकर्षित करीत असल्याचे काँग्रेसचे टेन्शन वाढलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पोटनिवडणुकीतही टीएमसीकडून काँग्रेसचा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दुसरीकडे भाजपच्या विजयी रथाला रोखण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन होत आहे. BJD-DMK सुद्धा या तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढलं आहे. सध्या आठ पक्ष या तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होत आहेत.

Mamata Banerjee ON Rahul gandhi face of opposition
BJP News : 'सावरकर समझा क्या..; काँग्रेसच्या टि्वटला भाजपचे प्रत्युत्तर , वाजपेयींचा तो Video व्हायरल

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही भेट घेणार आहेत. तिसरी आघाडी मजबूत बनविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसला विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून हटविण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com