Sanjay Raut : मोठी बातमी: राऊतांचा पाय खोलात ; बार्शीत गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीचा फोटो व्हायरल करणे पडलं महागात..

Case Registered On Sanjay Raut: राऊतांनी तिचा फोटो का व्हायरल केला होता.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एका अल्पवयीन पीडीत मुलीचा फोटो टि्वट करणे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

काल (रविवारी) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. राऊतांच्या टि्वटनंतर भाजपने त्यांच्यावर टीकेच्या झोड उठवली होती. चित्रा वाघ यांनी राऊतांनी तिचा फोटो का व्हायरल केला, असा प्रश्न विचारला होता

Sanjay Raut
Mamata Banerjee : राहुल गांधी हेच मोदींचे सर्वात मोठे 'टीआरपी' ; ममता म्हणाल्या, "राहुल गांधींना 'हिरो'बनविण्याचा प्रयत्न.."

सोलापूरमधील बार्शी तालुक्यात काही दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची बोटे छाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस हवालदार निलंबित झाले होते. याप्रकरणी विधान परिषदेत प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.

खासदार संजय राऊत यांनी या अत्याचाराविषयी फोटोसह १८ मार्चला ट्विट केला होता. त्यानंतर बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्याची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा नाव न घेता खासदार संजय राऊत यांना दिला. राऊतांनी संबधीत मुलीचा फोटो टि्वट केल्याने तिची ओळख समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे.

Sanjay Raut
Third Front : काँग्रेसचं टेन्शन वाढलं ; BJPच्या विजयी रथाला हे आठ पक्ष रोखणार ; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरु

नेमक काय आहे प्रकरण

बार्शी येथे एका अल्पवयीन मुलीवर 5 मार्च रोजी अत्याचार करुन दुसऱ्या दिवशी आरोपींनी तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षय माने, नामदेव दळवी या दोन्ही आरोपींना अटक केली. संजय राऊतांनी आरोपी मोकाट असल्याचं टि्वट करुन म्हटलं होत.

त्या मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो देखील ट्वीट केला होता. यामुळे अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर झाली अशी तक्रार एका व्यक्तीने बार्शी पोलिसात दिली. त्या तक्रारीवरुन काल (रविवारी) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com