Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Contract Recruitment : कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय पृथ्वीराज चव्हाणांचा, फडणवीसांनी विरोधकांना उघडं पाडलं

Chetan Zadpe

Devendra Fadnavis Contract Recruitment : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार जुंपलेली आहे. यावरून राजकारण ढवळून निघत आहे. कंत्राटी भरतीबाबत विरोधक आक्रमक होऊन, आंदोलन करत आहेत. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारावर आरोप करत, कंत्राटी भरतीचा जीआर सरकारकडून रद्द करण्याची घोषणा केली.

फडणवीस म्हणाले, "कंत्राटी भरतीबाबत विरोधक जे काही गदारोळ उभं करत आहे. तेच याचे दोषी आहेत. ज्यांनी हे पाप केलंय तेच आज या विरोधात आवाज करत आहेत. म्हणून खरे दोषी कोण आहेत ते पुढे आले पाहिजे. यांची थोबाडं उघडे पडले पाहिजे." (Latest Marathi News)

"कंत्राटी भरतीबाबतचा पहिला निर्णय १३ मार्च २००३ ला झाला होता. सर्व शिक्षण योजना अतंर्गत शिक्षण विभागात कंत्राटी भरती झाली होती. काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हण यांच्या काळातही कंत्राटी भरती केली गेली. ६००० पदांच्या भरतीसाठी जी आर काढण्यात आला, असेही फडणवीस म्हणाले.

"काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना शिक्षक भरतीचा कंत्राटी जीआर काढण्यात आला. माजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राची भरतीचा जीआर काढण्यात आला. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना १२६९ पदे कंत्राटी भरती जीआर काढण्यात आला," असे फडणवीस म्हणाले.

"सर्वांचाच चेहरा उघडा केला पाहिजे. १ सप्टेंबर २०२१ ला या भरतीला मान्यता मिळाली. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली. आता हे कुठल्या तोंडाने विरोध करत आहेत. कंत्राटी भरतीचं पाप हे काँग्रेस-शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचं आहे. याचं पाप आता आम्ही धुऊन काढत आहोत. त्यामुळे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा करत आहे," असे फडणवीस म्हणाले.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT