Satara supriya sule news : ड्रगमाफिया ललित पाटीलप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील जनतेला खरे सांगणार होते. ते कधी सांगणार, असा प्रश्न करून तुम्ही गृहमंत्री असताना हा आरोपी पळून कसा गेला, याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेसाठी खासदार सुळे यांचे काल (गुरुवारी) साताऱ्यात आगमन झाले. या वेळी त्यांच्याशी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांनी संवाद साधला.
ललित पाटीलप्रकरणी त्या म्हणाल्या, "राज्याच्या गृहमंत्र्यांना हात जोडून विनंती करते, की त्यांनी स्पष्ट व खरे बोलावे. काय ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे. ड्रग्ज हा राजकीय विषय नाही. हे थांबले पाहिजे. यासाठी आम्ही सरकारबरोबर उभे राहू. ज्यांच्या काळात हे झाले ते शोधले पाहिजे. राज्यातील जनतेला खरे सांगणार असे सांगत होते. ते कधी सांगणार असा प्रश्न करून तुम्ही गृहमंत्री असताना हा आरोपी पळून कसा गेला, याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना केला.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चांगलेच चर्चेत आहे. परंतु या प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांचा संबंध जोडला जात आहे. मुळात ललित पाटील याने 2016 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी खासदार संजय राऊत हे नाशिकचे संपर्कप्रमुख होते, असा टोला लगावत सोशल मीडियावर ललित पाटील याच्यासोबत फोटोमध्ये ज्या-ज्या व्यक्ती दिसत आहेत, त्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे यांनी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.