Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : शिंदेंच्या आमदारांना 'चारसौ चालीस का करंट': भाजपचे एकला चलो रे...?

Rashmi Mane

Devendra Fadnavis Maharashtra Politics : फोडाफोडी, ठाकरेंसोबत दुश्मनी, ठाकरेंच्या नाकावर टिच्चून शिंदेंकडे 'सीएम' पद, ठाकरेंचे राजकारण रोखण्याच्या उद्देशाने राज ठाकरेंशी जवळीक...अशा नको तेवढ्या उठाठेवी केलेल्या भाजप नेतृत्वाच्या पदरी पराभवाचे 'फळ' मिळाले. शिंदे, पवार आणि राज यांचा फायदा नव्हे प्रचंड तोटाच झाल्याचे कळून चुकले आहे. केंद्र आणि राज्यात सलग सत्ता भोगलेल्या आणि आता पराभवाच्या दरीत कोसळलेले भाजप पुन्हा दमदारपणे उभे राहण्यासाठी 'एकला चलो रे' च्या पवित्र्यात येऊ शकते.

पुढच्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून लढण्यापेक्षा एकटेच लढणार असल्याचे बोलले जात आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजप एकटे लढल्यास मित्रपक्ष आणि भाजपकडच्या 'महाशक्ती'वर भरवसा ठेवून ठाकरेंशी गद्दारी केलेल्या शिंदेंच्या सेनेतील आमदारांना 'चारसो चाळीस'चा करंट बसणार, हे नक्की. तर, पवारसाहेब सोडून अजितदादांचे हात बळकट केलेल्या राष्ट्रवादीतील आमदारांचेही स्थिती 'आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी होईल.

ठाकरे-पवारांना शह देण्याच्या नादात भाजप विशेषतः उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या दोघांचे पक्ष आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी होईल. ठाकरे-पवारांना शह देण्याच्या नादात भाजप विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) या दोघांचे पक्ष फोडले. त्यांना साथीला घेऊन सत्तांतर घडवले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उरल्या-सुरल्यानाही घेऊन 'ताकदवान' होण्याचा प्रयत्न केला.

निवडणुकीच्या निकालात मात्र काटे उलटे फिरले आणि भाजपचे जबरदस्त पिछेहाट झाली. निवडणुकीत मार खाल्ल्याची कबुली फडणवीसांनी मीडियापुढे दिली. तेवढ्यावरच न थांबता, सरकारमधून मोकळे होण्याची अपेक्षाही बोलून दाखवली. 'मी हारणार नाही. ताकदीने लढणार असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे आता सांगून टाकले. त्यामुळे भाजप विधानसभेची निवडणूक फार सिरियस होऊन लढू शकतो.

विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार देऊन विरोधी ठाकरेंची शिवसेना, पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत थेट दोन हात करण्याची खेळी भाजप खेळू शकते. तेव्हाच, महायुतीतील घटकपक्ष शिंदेंची शिवसेना, अजितदादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला चार हात लांब केल्यास जागामध्ये घट होण्याऐवजी वाढ होण्याची अपेक्षा भाजपमधील काही नेत्यांना असावी.

निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा मित्रपक्षांना हाक देता येईन, पण काही केल्या आगामी निवडणूक स्वबळावर लढायची, याकडे भाजप नेतृत्वाचा कल राहू शकतो. ज्या पक्षाच्या लोकांवर प्रचंड आरोप झाले. त्याच लोकांना विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग देण्याचा प्रयोग भाजपच्या मूळ मतदाराच्या पचनी पडला नाही. त्यातून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या प्रतिमेला तडे गेले आणि निवडणुकीत प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुधाने तोंड भाजलेले भाजप नेतृत्व आता ताकही फुंकून पिणार, हे नक्की. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे' चा प्रयोग केला जाऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT