Devendra Fadnavis : निवडणूक ठासून नाही घासून झाली, देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच मांडली

Devendra Fadnavis said reason of defeat : निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.91 टक्के मतं मिळाली तर आम्हाला 43.60 मतं आहेत.
Sharad Pawar Devendra Fadnavis Uddhav thackeray
Sharad Pawar Devendra Fadnavis Uddhav thackeray sarkarnama

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या 45 पारचा दावा करणारी भाजपा 9 जागांवर आली आहे. तर,महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीने दणक्यात 30 जिंकल्यात. ही निवडणूक एकतर्फी झाली म्हणणाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडून घासून झाली असल्याचे सांगत मतदानाची आकडेवारीच जाहीर केली आहे.

निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.91 टक्के मतं मिळाली तर आम्हाला 43.60 मतं आहेत. महाविकास आघाडीपेक्षा अर्धा टक्क्या कमी मतदान आम्हाला आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीला दोन कोटी 50 लाख मतं मिळाली आहेत. तर, महायुतील दोन कोटी 48 लाख मतं आहेत.

म्हणजे महायुतीला अवघी दोन लाख मतं कमी आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. निवडणुकीच्या अर्थमॅटीक्स मध्ये कमी पडलो, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबईत महाविकास आघाडीला चार तर, महायुतीला चार जागा मिळाल्या आहेत. मात्र, महाविकास विकास आघाडीला 24 लाख मतं मिळाली आहेत. तर, महायुतीला 26 लाख मतं आहेत. महाविकास आघाडी पेक्षा महायुतीला दोन लाख मतं मुंबईत महायुतीला जास्त असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ठणकावून सांगितले आहे.

Sharad Pawar Devendra Fadnavis Uddhav thackeray
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची राजीनाम्याची तयारी, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

राजीनामा देण्याची तयारी

महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. अपेक्षा पेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आहेत, अशी कबूली देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच भाजपला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री शिंदे आणि आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपल्याला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करणार असल्याची विनंती करणार, असल्याचे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com