Mohit Kamboj News : भारतीय जनता पक्षाचे उदयोन्मुख नेते आणि मोहित कंबोज यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. फ्री प्रेस जनरल या इंग्रजी माध्यमातील वृत्तपत्राने ही बातमी दिली. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी त्यांनी घेतलेल्या या निर्णायचे भाजपमधीलच अनेक नेत्यांना आश्चर्य वाटत आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष, भाजपचे एकेकाळचे सर्वात श्रीमंत उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून कंबोज यांची ओळख आहे. सध्यै ते भाजपचे सदस्य आहेत, परंतु 6 महिन्यांपासून ते जाणीवपूर्वक सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. "मी माझ्या व्यवसायासाठी अधिक वेळ देऊ इच्छितो," असे त्यांनी स्पष्ट केले.
मोहित कंबोज मूळचे वाराणसीचे आहेत. पण 2002 मध्ये ते मुंबईत आले आणि व्यवसायाच्या माध्यमातून अल्पावधीतच जम बसवला. ते इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष झाले. इथे काम करताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडला. 2013 मध्ये भाजपने त्यांच्याकडे शहर भाजपचे उपाध्यक्षपद दिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले.
या तिरंगी लढतीत मोहित कंबोज यांचा शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी पराभव केला. पराभवानंतरही त्यांना भाजपच्या युवा शाखेच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष करण्यात आले. या निवडणुकीत ते भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. 353. 53 कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी घोषित केली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता काबीज केल्यानंतर, फडणवीसांशी असलेल्या जवळीकतेमुळे कंबोज यांचे राजकीय स्थान वाढले. निकालानंतर लगेचच फडणवीस यांना उचलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता कंबोज यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली आहे. आता त्यांनी जागतिक स्तरावर बुलियन, रिअल इस्टेट इत्यादी व्यवसायांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.