NCP Vs BJP : 'तुम्ही निवडून आलात हाच राजकीय अपघात, आता चोराच्या उलटा बोंबा बंद करा', फडणवीस आणि दादांचे नेते थेट भीडले

Political Clash in Bhor : पुण्याच्या भोर मतदारसंघात सध्या विकास कामांच्या श्रेयवादातून आजी-माजी आमदार भिडताना दिसत आहेत. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.
NCP Vs BJP Sangram Thopte vs Shankar Mandekar
NCP Vs BJP Sangram Thopte vs Shankar Mandekarsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. भोर, राजगड आणि मुळशी मतदारसंघात संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर आमनेसामने आले आहेत.

  2. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नियोजनातून राजकारण तापले आहे.

  3. विकास कामांचे श्रेय घेण्यावरून श्रेयवादाने वाद अधिक चिघळला आहे.

  4. मांडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन थोपटे यांच्यावर टीका केली.

  5. थोपटे यांनीही पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.

Pune News : भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस मधून नुकतेच भाजपमध्ये आलेले माजी आमदार संग्राम थोपटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारसंघात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे नियोजन आणि विकास कामांच्या श्रेयवादातून या दोन्ही नेत्यांचे वाद आता विकोपाला पोचले असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी शंकर मांडेकर यांनी पत्रकार परिषद घेत संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. त्यानंतर थोपटे यांनी देखील पत्रकार परिषद घेत त्याला उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळाल.

संग्राम थोपटे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी माझ्यावरती खोटे आरोप केले आहेत. मतदारसंघातील जनतेने जो निर्णय दिला तो मी मान्य केला आहे. आता पुढील राजकीय वाटचालीला देखील सुरुवात केली आहे. झालेल्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मतदार संघातील जे मतदार माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे विविध विकासकामे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न आहे.

NCP Vs BJP Sangram Thopte vs Shankar Mandekar
NCP vs BJP News : अजितदादांच्या मंत्र्यांचं घर फुटलं : सख्खा भाऊ भाजपमध्ये, 8 महिन्यांचे प्रयत्न यशस्वी

मात्र आमदार मांडेकर यांचा जो विजय झाला आहे. तो राजकीय अपघात होता. ते माझ्यावरती टीका करताना म्हणतायेत की, मी सत्ते शिवाय राहू शकत नाही म्हणून पक्ष बदलला आहे. मात्र सत्तेपासून कोण राहू शकत नाही, याबाबत त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनाच विचाराव असं म्हणत थोपटे यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नियोजनाबाबतही थोपटे यांनी मांडेकरांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचनेनुसार मी नियोजन करतोय. याची मिरची तुम्हाला का झोंबली? असा थेट सवाल थोपटे यांनी मांडेकर यांना विचारला आहे. तसेच माझ्या 15 वर्षाच्या कामांचे प्रगती पुस्तक पाठवतो, मग काय कामे झाली ते समजेल," असाही टोला त्यांनी लगावला आहे.

मतदार संघामध्ये जी काही विकास काम करण्यात येत आहे. त्या विकास कामाचं श्रेय घेण्याचं काम आमदार करत आहे. हे सगळी विकास काम मंजूर करण्याचं काम पालकमंत्री म्हणून अजित पवार करत असल्याचे सांगत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव घेणं हे टाळत आहेत. राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकत्रित काम करत असताना इथं मात्र स्थानिक आमदार राजकारण करत असल्याचा आरोप देखील संग्राम थोपटे यांनी केलाय.

राजगडला कर्जपुरवठा होऊ नये म्हणून सतत काही लोकांकडून प्रयत्न झाले. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जपुरवठा करून कर्मचारी आणि सभासदांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राजगडला त्रास देणाऱ्यांना चपराक बसली," असल्याची दावा देखील त्यांनी केला आहे. आता मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचा आदेश आल्यास युती म्हणून लढू. मात्र या मतदारसंघांमध्ये पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावरती असून त्या दृश्यइकोणातून स्थानिक पातळीवर आम्ही पक्ष वाढीचे काम करू असं म्हणत वेळ पडल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याबाबतचे संकेत फक्त यांनी दिले.

NCP Vs BJP Sangram Thopte vs Shankar Mandekar
BJP Vs NCP : निवडणुकीच्या आधीच रणधुमाळी! भाजप-राष्ट्रवादी आमने सामने; मुश्रीफांच्या दाव्याने महायुतीत मिठाचा खडा?

FAQs :

प्रश्न 1: वाद कोणत्या मतदारसंघात सुरू आहे?
उत्तर: भोर, राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघात.

प्रश्न 2: वादाचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर: आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आणि विकास कामांचे श्रेयवाद.

प्रश्न 3: कोणते नेते या वादात आमनेसामने आले आहेत?
उत्तर: भाजपचे संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर.

प्रश्न 4: अजित पवार यांचा यात काय संबंध आहे?
उत्तर: संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत अप्रत्यक्षपणे अजित पवारांना लक्ष्य केले.

प्रश्न 5: वाद कसा वाढला?
उत्तर: आरोप-प्रत्यारोप पत्रकार परिषदांमुळे वाद विकोपाला पोहोचला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com