Devendra Fadnavis News : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महायुतीला बंडोखोरांना थंड करण्यात मोठे यश आले आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीमधील बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवार अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र, ते सरवणकर आपल्या उमेदवारी कायम राहिले.
'साम टिव्ही'ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माहिम मतदारसंघाबाबत असलेल्या दृष्टिकोनाबाबत मोठा दावा केला आहे. 'साम'चे संपादक निलेश खरे यांनी 'ब्लॅक अँड व्हाईट' या सदरात ही खास मुलाखत घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनापासून इच्छा होती की एक जागा सोडून द्यावी. पण सदा सरवणकर हे वरिष्ठ नेते आहेत. सरवणकर यांना विश्वात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी टोकाचा प्रयत्न केला.दुर्देवाने तो यशस्वी झाला नाही, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजून चर्चा करून काही मार्ग आहे की ते बघू. शिंदेजी कुठेही असं करू नये या मताचे नव्हते. उलट प्रयत्न पूर्वक समर्थन केले पाहिजे, असे म्हणत अमित ठाकरेंना पाठींबा देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक होते, असे स्पष्ट संकेत फडणवीसांनी दिले.
अमित ठाकरेंचा पराभव झाला तर तो राज ठाकरेंचा देखील पराभव असेल असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, मला वाटतं राज ठाकरेंचा पराजय होणार नाही. निवडणुकीमध्ये जय पराजय हा निवडणुकीचा एक भाग आहे. विजयाने कोणी चिर अमर होत नाही. एखाद्या पराजयाचे कोणी संपत नाही. आत्तापासून कोण निवडून येतील कोण पराजित होतील, असा विचार न करता पुढे काय होतं हे पाहात राहावे. एकाद्या पराजयाने विचारांचा पराभव होतो असे मानणाऱ्यांपैकी मी नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.