Sada Sarvankar News: माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सदा सरवणकर उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एका तास आधी सदा सरवणकर हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांना भेट नाकारली.
मी उमेदवारी मागे घेतली तर ही निवडणूक अमित ठाकरेंना अवघड जाईल. हे समीकरण राज ठाकरेंना सांगयला आलो होतो. मात्र, मी उमेदवारीवर कायम आहे, असे सदा सरवणकर म्हणाले.
इच्छा अशी आहे एक एक आमदार निवडूण आला पाहिजे. हे समीकरण महत्त्वाचे आहे. मी जर माघार घेतली तर अमितजींना कसा त्रास होईल, हे राजसाहेबांना सांगण्यासाठी आलो आहे. मात्र मी उमेदवारी कायम ठेवणार आहे, असे सदा सरवणकर म्हणाले.
सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघात सदा सरवणकर, मनसे उमेदवार अमित ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.