CM Shinde and Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच सभा शंभुराज देसाईंच्या मतदारसंघात!

Shivsena Patan Assembly Constituency : उद्या दुपारी १२ वाजती ही सभा तांबवे येथे होईल. त्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
CM Shinde and Shambhuraj Desai
CM Shinde and Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Vidhan sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांसह विविध पक्षांचे महत्वाचे नेते, पदाधिकारी यांचे दौरे सुरु झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री पहिल्यांदाच उद्या(मंगळवार) सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पालकमंत्री शंभुराज देसााई यांच्या प्रचारार्थ पाटण विधानसभा मतदार संघातील तांबवे या गावात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर ते सांगली जिल्ह्यातील सभेस रवाना होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यासाठी महायुती आण महाविकास आघाडीतील(MVA) प्रत्येक पक्षासह अपक्षांनीही आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी फिल्डींग लावली आहे.

CM Shinde and Shambhuraj Desai
Madhurima Raje Chhatrapati News : कोल्हापुरच्या 'आखाड्यात' उतरण्यापूर्वीच काँग्रेस चितपट; मधुरीमाराजेंची शेवटच्या क्षणी माघार!

पक्षांच्या स्टार प्रचारकांसह विविध पक्षांचे महत्वाचे नेते, पदाधिकारी यांचे दौरे सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा ही उद्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंत्री शंभुराज देसाई(Shambhuraj Desai) यांच्या मतदार संघात होत आहे. उद्या दुपारी १२ वाजती ही सभा तांबवे येथे होईल. त्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

CM Shinde and Shambhuraj Desai
Sada Sarvankar : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकरांची माघार नाहीच; माहीममध्ये तिरंगी लढत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास येथील विमानतळावर हेलीकॉप्टरने येतील. तेथुन ते खासगी वाहनांतून तांबवेतील सभास्थळी दाखल होणार आहेत. मुख्यंत्री उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com