Devendra Fadnavis News :  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : युतीत कळीचा मुद्दा ठरलेल्या जाहिरातींवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आमची कुणी चिंता..'

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेनेने वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहीरातींवरून मोठा वाद निर्माण झाला होता. वर्तमानपत्रामध्ये झळकलेल्या 'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' य़ा घोषणेमुळे युतीत मिठाचा खडा पडला, अशी चर्चा सुरू होती. या जाहिरातीनंतर भाजप शिवसेनेत सारंकाही आलबेल नसल्याचं समोरही आलं होतं. भाजप नेत्यांच्या नाराजीनंतर शिवसेना नेत्यांची सारवासारव करताना पुरती दमछाक झाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मघाशी मुख्यमंत्री आणि मी एकत्रित हेलिकाँप्टरमधून उतरलो. तर एवढ्यात मिडीयातला आमचा एक बंधू आला आणि म्हणाला, तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला, कसं वाटतंय? अरे आमचा एकत्रित प्रवास पंचवीस वर्षांचा आहे. पण मागील वर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणी करण्याची गरज नाहीये."

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदेंसोबतचा प्रवास तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आहे आणि तो उद्याही सोबतच राहणार आहे, कारण- आम्ही सरकार बनवलं खुर्च्या तोडण्याकरता नाही, पद मिळवण्याकरता नाही, हे सरकार लोकांच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन करण्यासाठी आलं आहे."

"एखाद्या जाहीरातीमुळे, एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्य़े काही होईल, एवढं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही, कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर करायचं? याच्यासाठी एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितले, पण आमचं सरकार सामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे , असाही टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT