Sanjay Raut : धमकीचे फोन आले हे सांगायला २४ तास का लागले... शंभूराज देसाईंचा सवाल

Sanjay Raut राऊत यांच्यात काेणत्याही प्रकारचे धाडस नाही हे यापुर्वीच सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे.
Sanjay Raut, Shambhuraj Desai
Sanjay Raut, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

सातारा : तुम्हाला धमकीचे फोन आले हे सांगण्यास चाेवीस तास का लागले, असा सवाल साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना केला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विराेधी नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक हल्ले हाेऊ लागले आहेत. साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आजही शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबाेल करीत तुम्हाला धमकीचे फाेन आले हे सांगण्यास चाेवीस तास का लागले असा सवाल राऊतांना केला आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा येथे पत्रकार परिषद सुरु आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालास प्रारंभ झाला आहे. त्यावर बाेलताना देसाई म्हणाले कितीही कुणी यात्रा काढल्या, कुणाच्या पाठीमागे राहायचं प्रयत्न केला, कुणाच्या हातात हात घालून चालला तरी काही फरक पडत नाही हे आजच्या निकालानंतर स्पष्ट हाेईल असा टाेला देसाईंनी राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष मारला.

Sanjay Raut, Shambhuraj Desai
Gujarat Election Result : गुजरातचा निकाल देशाला दिशा देणारा... शंभूराज देसाई

देसाई म्हणाले संजय राऊत यांनी त्यांची वाचाळ बडबड बंद करावी. त्यांच्यात काेणत्याही प्रकारचे धाडस नाही हे यापुर्वीच सर्व महाराष्ट्राने पाहिली आहे. आता चाेवीस तासांनंतर राऊत म्हणतात मला धमकीचे फोन आले. त्यांना माध्यमांच्या समोर येऊन सांगायला चाेवीस तास का लागले असा सवाल देसाईंनी केला आहे.

Sanjay Raut, Shambhuraj Desai
संजय राऊत म्हणाले, मी येतोय...निवडणूक तयारीला लागा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com