Shambhuraj Desai Big Statement : शिवसेनेची कोलांटउडी,जाहिरात आम्ही दिलीच नाही; शंभूराज देसाईंचा अजब दावा

BJP Vs Shivsena Dispute : ''आजच्या जाहिरातीशी शिवसेना पक्षाशी कसलाही संबंध नाही...''
Shambhuraj Desai Big Statement
Shambhuraj Desai Big Statement Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेनेच्या मंगळवारी (दि.१३) वर्तमानपत्रामध्ये झळकलेल्या राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे युतीत मिठाचा खडा पडला आहे. या जाहिरातीनंतर भाजप शिवसेनेत सारंकाही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. भाजप नेत्यांच्या नाराजीनंतर शिवसेना नेत्यांची सारवासारव करताना पुरती दमछाक झाली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान करतानाच आजच्या जाहिरातीशी शिवसेना पक्षाशी कसलाही संबंध नाही, कोणीतरी शुभचिंतकानं ही जाहिरात दिली असल्याचं म्हटलं आहे.

मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या जाहिरातींवर भाष्य केलं. देसाई म्हणाले, आजच्या जाहिरातीशी शिवसेना पक्षाशी कसलाही संबंध नाही. कोणीतरी शुभचिंतकानं ही जाहिरात दिली आहे. पण आम्ही दोघंही एक नंबरला आहोत याचा आनंद आहे असं देसाई यांनी यावेळी सांगितले.

Shambhuraj Desai Big Statement
Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री शिंदेंसोबचा देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द; राजकीय वर्तुळात चर्चा...

आमचे हितचिंतक अज्ञात आहेत...

तसेच आमचे हितचिंतक अज्ञात आहेत, लाखो हितचिंतकांपैकी एक कुणी असावा. ज्याने ही जाहिरात दिली आहे. आम्ही जाहिरात दिलीच नाही. कोण दिली कुठे दिली माहिती नाही. जाहिरातींशी शिवसेना(Shivsena) पक्षाचा कसलाही संबंध नाही असं स्पष्ट मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

शिवसेनेच्या झळकलेल्या जाहिरातींमुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. यानंतर राज्यातलं राजकारण देखील चांगलंच ढवळून निघालं असून विरोधकांकडून भाजपला चांगलंच डिवचलं जात आहे. तसेच शिवसेनेचा कोट्यवधी रुपये खर्च करुन अशी जाहिरात देणारा हितचिंतक कोण आहे यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Shambhuraj Desai Big Statement
Solapur Bjp Politic's : विजयकुमार देशमुखांच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग;समर्थक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे फडणवीसांना साकडे

फडणवीसांचा शिवसेना मंत्र्यांना 'हा' कानमंत्र ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांशी बंद दरवाजाआड चर्चा केली. या बैठकीत फडणवीस म्हणाले, कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार आहे. सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपण एकत्रच आहोत. ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. युतीत खडा पडेल, असं कोणतंही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका असा कानमंत्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याची चर्चा सुरु आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com