Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : ठाण्यात आपणच गुलाल उधळणार, पण...; फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना केले रिचार्ज

Sunil Balasaheb Dhumal

Thane Political News : ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र येथे भाजपचीही मोठी ताकद आहे. एकंदरीत ठाणे लोकसभा मतदारसंघा हा महायुतीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे येथून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजय निश्चित मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याचा गुलाल उधळायला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत येणार, असा विश्वास व्यक्त केला.

ठाण्याचे मतदान पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी होत आहे. या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. दरम्यान, शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के Naresh Mhaske यांच्या प्रचारार्थ ठाण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना येथे आपली ताकद आहे म्हणून गहाळ बसू नका. जोमाने कामाला लागून म्हस्केंना विजयी करा, असे आवाहन करत ठाण्यातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी येतो, असा शब्द दिला आहे.

फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, ठाण्यात 1977 पासून ते आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणूकीत पाच वेळा भाजप तर, सात वेळा शिवसेना विजयी झाली आहे. या मतदारसंघात कायम युतीचे वर्चस्व राहिलेले आहे. येथील ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर पालिकेतही युतीची सत्ता असून आमदारही आपलेच आहेत. यातून ठाण्यातील मतदारांचाही कौल आपल्याकडे आहे. मात्र मताधिक्य मिळवण्यासाठी कुणीही गाफिल राहू नये, असेही फडणवीस यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण कुणा एका राजकीय पक्षाचे काम करत नसून नव भारत निर्मितीसाठी कार्य करत आहोत. नवभारताचे सैनिक म्हणून काम करताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना Narendra Modi कसे निवडून देऊ, याचा विचार केला पाहिजे. आता लोकांच्या मनामध्ये मोदी आहेत. लोकांच्या मनातले मोदी हे मतांच्या पेटीपर्यंत कसे पोचवायचे, हीच आपली मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे 20 तारखेला आराम करायचा नाही, असेही आवाहन फडणवीसांनी भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT