Election Commission : अबब! पाचव्या टप्प्यापर्यंत तब्बल 8 हजार 889 कोटी जप्त; निवडणूक आयोगाची धडाकेबाज कामगिरी

Lok Sabha Election And Election Commission : सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आता निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत असेपर्यंत निवडणूक आयोगानेही जोरदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत आयोगाने आठ हजार 889 कोटी रुपयांचे घबाड जप्त केले आहे.
Election Commission Of India
Election Commission Of IndiaSarkarnama

Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे पार पडले आहे. तर 20 मे रोजी पाचवा टप्पा होत आहे. या काळात मतदान निर्विघ्न पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने चांगलीच कंबर कसल्याचे दिसून आले. निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी तैनात बंदोबस्तात आयोगाने सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे घबाड जप्त केले आहे.

सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Election धामधूम सुरू आहे. आता निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत असेपर्यंत निवडणूक आयोगानेही जोरदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत आयोगाने आठ हजार 889 कोटी रुपयांचे घबाड जप्त केले आहे. यात रोख रक्कमेसह अवैध वस्तूंचाही समावेश आहे. याबाबत निवडणूक आयोगानेच माहिती जाहीर केली आहे. या कारवाईमुळे आयोगाचे कौतुक होत असले तरी ऐन लोकसभा निवडणुकीत मोठी मालमत्ता जप्त केली गेल्याने उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत.

देशात गेल्या तीन टप्प्यांतील प्रचार जोरदार सुरू आहे. या काळात मतदारांवर विविध मार्गांनी प्रभाव टाकण्याचेही प्रयत्न झाले. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची Election Commission मोठी यंत्रणा कामाला लागली होती. लोकसभा निवडणूक स्वच्छ आणि निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार विविध संस्था कार्यरत होत्या. त्या सर्व संस्थांनी मिळून आत्ताप्रर्यंत तब्बल आठ हजार 889 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. आता हा आकडा लवकरच नऊ हजार कोटींचा टप्पा पार करणार असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Election Commission Of India
Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'अजित पवारांनी मदतीचा हात मागितला तर देणार का?'; शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

निवडणूक आयोगाच्या वतीने जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ड्रग्जचे प्रमाण मोठे आहे. जप्तीच्या एकूण मालमत्तेत तब्बल 45 टक्के ड्रग्जच्या आहे. या ड्रग्जची एकूण किंमत ही तीन हजार 958 कोटी रूपये आहे. मोठ्या प्रमाणत ड्रग्ज जप्तीमुळे देशात खळबळ उडाली आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. विविध जिल्ह्यांचा वारंवार आढावा घेतला. तसेच रस्त्यावरील यंत्रणांच्या दक्षतेमुळे हे शक्य झाल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Election Commission Of India
Modi Vs Pawar : आधी मोदींची लोकांमध्ये हवा, नंतर मनातूनच उतरले; लोकसभेचं वारं नेमकं कसं फिरलं पवारांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com