Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'अजित पवारांनी मदतीचा हात मागितला तर देणार का?'; शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

NCP Political News : पवार विरुध्द पवार हा संघर्ष भाजपने घडवून आणला असून त्यांना हे हवेच होते. भाजपने इतरांबाबतही तेच केले आहे. हा प्रश्न माझ्यापुरता मर्यादीत नाही. राज्यातील अनेक लोकांनी हा पक्ष उभा केला होता.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार गट भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांचे राजकारण संपवण्याचेच ध्येय असल्याचे विधान केले होते. असे असतानाही पवार कुटुंब एकच असल्याची चर्चा होत होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीत कधी नव्हे असा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येईल, अशाही चर्चा झाल्या. या चर्चांना मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांनी Sharad Pawar फुलस्टॉप देत अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. Sharad Pawar Vs Ajit Pawar

शरद पवारांनी एका खासगी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या Ajit Pawar स्वभावाबाबत मोठा खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरू झालेला संघर्ष हा पवार कुटुंबिय पातळीवर नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी राज्यातील अनेक नेत्यांचे मोठे योगदान आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. हा संघर्ष कुटुंब पातळीवर नाही, तर अजित पवारांनी मदतीचा हात मागितला तर देणार का? असा प्रश्न पवारांना करण्यात आला. यावर पवार म्हणाले, अजितचा स्वभाव मला माहिती आहे, तो कधी कुणापुढे हात पसरणार नाही.

पवार कुटुंबात पूर्वीपासूनच मतमतांतर आहेत. राजकीय मत वेगळे असले तरी कुटुंब एकत्र होते. आता अजित पवार वेगळी भूमिका घेत भाजपसोबत गेले असले तरी कुटुंब दिवाळीनिमित्त एकत्र आले होते. राजकीय मते वेगळी असले तरी कुटुंब एक होते. मात्र आता बारामती पवार विरुद्ध पवार संघर्ष निर्माण झाला. यातून कुटुंबियांची मने दुंभगल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Modi Vs Pawar : आधी मोदींची लोकांमध्ये हवा, नंतर मनातूनच उतरले; लोकसभेचं वारं नेमकं कसं फिरलं पवारांनी सांगितलं

यावर पवार म्हणाले, हे घडले नसते तर मला आनंद झाला असता. ज्यांनी पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक केली, त्या कधीही राजकारणात, समाजकारणात नव्हत्या. याउलट सुप्रिया सुळे Supriya Sule या तीन वेळ खासदार आहेत. त्यापूर्वीही राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यांचे कामही चांगले आहे. आता मतभिन्नता झाली नसती तर चांगले झाले असते. आता लोकशाहीत कुणी कुठलीही भूमिका घेऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार विरुध्द पवार हा संघर्ष भाजपने घडवून आणला असून त्यांना हे हवेच होते. भाजपने इतरांबाबतही तेच केले आहे. हा प्रश्न माझ्यापुरता मर्यादीत नाही. राज्यातील अनेक लोकांनी हा पक्ष उभा केला होता. 1999 पासून आम्ही सत्तेत आहोत. त्यातून त्यांनी विविध पदे भोगली आहेत. आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आता विधानसभेच्या निवडणुकीत खरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असाही इशारा पवारांनी अजित पवारांना दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Ajit Pawar
Ramdas Athawale On J P Nadda: जे.पी. नड्डांच्या 'आरएसएस' संदर्भातील विधान मंत्री आठवलेंनाही खटकलं; म्हणाले, 'एकेकाळी संघाची...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com