Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Fadnavis On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच सांगितला....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) कधी होणार, याची चर्चा राज्यात जोरदारपणे सुरू आहे. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हे स्पष्टपणे सांगितले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. (Devendra Fadnavis himself told the timing of cabinet expansion...)

देवेंद फडणवीस म्हणाले की, कायदेशीर आणि घटनात्मक दृष्टीनेच हे सरकार स्थापन झालेले आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, असे मलाही वाटते. कारण, अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. जेव्हा विधानसभा आणि विधान परिषदेत एकाच विषयावर चर्चा सुरू असते, तेव्हा आमची ओढाताण होते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आम्हाला करायचा आहे, तो आम्ही करू. पण, मंत्रिमंडळ विस्तारासाठी कोणतीही कायदेशीर अथवा संविधानिक अडचण नाही.

योग्य वेळी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. शक्य तो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच आम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना स्पष्ट केले.

राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी नऊ कॅबिनेट मंत्री आहेत. या वीस लोकांच्या माध्यमातून राज्याचा गाडा हाकला जात आहे. एका एका मंत्र्यांकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. तसेच, अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्याचा कार्यभार आहे, त्यामुळे विद्यमान मंत्र्यांवर सध्या कामाचा बोझा आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे.

दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छूक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. भाजप आणि शिंदे गटातील अनेक आमदारांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. कारण विधानसभेचा कालावधी तीन ते सव्वा तीन वर्षांचा झाला आहे. उर्वरीत काळात काम करायचे की आचारसंहितेमध्ये अडकून पडायचे, असा सवालही काही आमदारांनी बोलून दाखवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT