Guhagar kharedhi and vikri sangh election
Guhagar kharedhi and vikri sangh electionSarkarnama

Konkan News : भास्कर जाधवांना गुहारमध्येच मोठा धक्का : ‘खरेदी-विक्री’च्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटाने उडवली दाणादाण

ही निवडणूक शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिष्ठेची केली होती
Published on

गुहागर (जि. रत्नागिरी) : गुहागर (Guhagar) तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप (BJP), बाळासाहेबांची शिवसेनेच्या (Eknath Shinde) सहकार पॅनेलचे १२, तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ३ उमेदवार निवडून आले. ही निवडणूक शिवसेनेचे (Shivsena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यांचे प्रयत्न असफल ठरले. या निवडणुकीत अनेक वर्षे गुहागर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघ, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद भूषवणारे राष्ट्रवादीचे (NCP) गुहागर तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच, आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय तथा गुहागरचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांचा पराभव झाला. (Defeat of Bhaskar Jadhav's panel in Guhagar kharedhi and vikri sangh elections)

संचालकपदाच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे रवींद्र अवेरे, सुरेश चौगुले, लक्ष्मण शिगवण, गणेश तांबे, नारायण गुरव आणि महाविकास आघाडीचे पंकज बिर्जे, पांडुरंग कापले या सर्वांना १० मते मिळाली. विजयी ७ उमेदवारांमधून ६ संचालक निवडायचे होते. त्यामुळे विजयी ७ उमेदवारांच्या चिठ्ठ्यांमधून १ चिठ्ठी उचलून तो उमेदवार बाद करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी घेतला. त्यामध्ये सहकार पॅनेलचे नारायण गुरव यांना बाद करण्यात आले.

Guhagar kharedhi and vikri sangh election
Narayan Rane News: अजित पवारांची सूचना नारायण राणेंनी कार्यक्रमातच हाणून पाडली!

खरेदी-विक्री संघाच्या १५ संचालकपदासाठी निवडणूक होती. त्यापैकी छाननीमध्ये भटके विमुक्त प्रवर्गात सहकार पॅनेलचा एक अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन बाईत बिनविरोध निवडून आले होते. मात्र, विकास सहकारी संस्था मतदार संघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Guhagar kharedhi and vikri sangh election
Nagar Lok Sabha : नीलेश लंके देणार सुजय विखेंना आव्हान : नगर लोकसभा लढविण्याचे संकेत

सहकारी पॅनेलचे सहकारी संस्था मतदारसंघातून श्रीकांत महाजन १२ मते, डॉ. अनिल जोशी, शाम गडदे, सिराज घारे यांना ११ मते पडून विजयी झाले. रवींद्र अवेरे, सुरेश चौगुले, लक्ष्मण शिगवण, गणेश तांबे यांनी १० मते घेऊन तर महाविकास आघाडीचे पंकज बिर्जे, पांडुरंग कापले यांना १० मते मिळवून विजय मिळाला. महिला मतदारसंघातून सहकार पॅनेलच्या अश्विनी जोशी, रश्मी घाणेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया साळवी, सुवर्णा भोसले यांचा पराभव केला.

Guhagar kharedhi and vikri sangh election
Sharad Pawar News: पवारांचे हेलिकॉप्टर दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले अन प्रशासनाची एकच धावपळ उडाली...

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून सहकार पॅनेलचे तवसाळ पडवे सोसायटी चेअरमन सुभाष कोळवणकर यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय जयदेव मोरे यांचा पराभव केला. मागासवर्गीय मतदार संघात सहकार पॅनेलचे पंचायत समिती माजी सभापती सुरेश सावंत यांनी अनंत पवार यांचा धुव्वा उडवला.

Guhagar kharedhi and vikri sangh election
Congress News : पालघरमध्ये काँग्रेसला धक्का : बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे अनेक वर्षे गुहागर सोसायटी, खरेदी-विक्री संघ, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद भूषवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आमदार जाधव यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. मतदारांची संख्या कमी असल्याने आमदार जाधव यांच्या प्रभावामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असे वातावरण होते. मात्र, महाविकास आघाडीचे केवळ ३ उमेदवार निवडून आले. त्यामुळे या पराभवाने आमदार जाधव यांना धक्का बसला आहे.

Guhagar kharedhi and vikri sangh election
VijayDada Meet Pawar : विजयदादा बारामतीत जाऊन शरद पवारांना भेटले....

माजी आमदार डॉ विनय नातू आणि जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. अनिल जोशी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष डॉ. आनंद जोशी, भाजप उत्तर रत्नागिरी ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजप जिल्हा चिटणीस मंगेश जोशी, इक्बाल घारे,विजय मसुरकर, पांडुरंग नाचरे, संदिप साळवी आदींनी सहकार पॅनेलच्या विजयासाठी परिश्रम घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com