Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद हा नेहमी औत्सुक्याचा विषय ठरला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता कोणत्याही मुख्यमंत्र्यांना सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आले नाही.
कोणत्या कोणत्या कारणाने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावे लागले किंवा त्यांच्यापुढे कसलेतरी संकट येऊन उभे राहिले. मात्र 2014 मध्ये आपल्याला शिवसेनेने धरलेल्या हट्टामुळे मला मुख्यमंत्रीपद मिळाले असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला युती आणि आघाडीच्या राजकारणाशिवाय पर्याय नाही. मात्र 2014 मध्ये विधानसभेच्या केवळ चार जागांसाठी शिवसेनेने भाजपबरोबर असलेली युती तोडली. शिवसेनेला आम्ही 147 मध्ये जागा देऊन आम्ही 127 जागांवर लढण्यास तयार होतो, पण आदित्य ठाकरे यांनी 151 जागांचा हट्ट धरला. यामुळे शिवसेनेन युती तोडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, शिवसेनेने युती तोडल्यामुळे आम्हाला आमची ताकद समजली. याचा मला वैयक्तित पातळीवर फायदा झाला व मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. जास्त जागा लढवू शकलो, यामुळे आमचे जागा वाढून आमचे अधिक उमेदवार निवडून आले.
जर आम्ही युतीत शिवसेनेबरोबर लढलो असतो तर आमचे उमेदवारांची कमी संख्येत निवडून आले असते अन् शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. आदित्य यांनी 151 जागांचा आग्रह धरला होता त्यामुळे शिवसेनेच्या हट्टापायीच मला मुख्यमंत्रीपद मिळाले, खरं तर मी त्यांचे आभारच मानतो, असे फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.