Pune BJP : लोकसभेच्या मतदानानंतर बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरून वाद पेटला; भाजप नेत्यांत नेमकं काय झालं?

Wetal Tekadi Road : पुणे महापालिकेतर्फे विधी महाविद्यालयाला पर्यायी मार्ग म्हणून वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा असा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता करताना टेकडी फोडावी लागणार आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध केला.
Medha Kulkarni
Medha KulkarniSarkarnama

Pune Political News : वेताळ टेकडीवरून प्रस्तावित बालभारती ते पौडफाटा रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध कायम आहे. लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेत आला होता. मतदान झाल्यानंतर मात्र, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना लक्ष्य केले.

'रस्त्याला 'विरोध करणाऱ्यानी काँग्रेसलाच मतदान केले आहे. त्यामुळे आता डंके के चोट पे हा रस्ता झालाच पाहिजे', अशी पोस्ट केली. त्यावर खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी 'या प्रकरणी ॲकॅडमिक चर्चा होऊ शकते. अशी विधाने केल्यास कृतघ्नपणाचा दोष लागेल,' अशा शब्दांत कान उघडणी केली. त्यांनतर त्या पदाधिकाऱ्याने पोस्ट डिलीट केली. मात्र बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेतर्फे PMC विधी महाविद्यालयाला पर्यायी मार्ग म्हणून वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा असा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता करताना टेकडी फोडावी लागणार आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध केला. प्रकल्पाविरोधात हजारो नागरिकांनी मोर्चा काढून निर्णय रद्द करण्याची मागणी केली. या आंदोलनाला खासदार मेधा कुलकर्णी यांनीही पाठिंबा दिला होता. या आंदोलनामुळे भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण होत असल्याने नागरिकांशी चर्चा केल्यानंतर या प्रकल्पाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगून यावर पांघरून घालण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha प्रचारातही बालभारती पौड फाटा रस्त्यास विरोध, वेताळ टेकडीचे संवर्धनाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यास काँग्रेसने थेट पाठिंबा दिला. तर भाजपने विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जाईल असे सांगितले होते. मात्र, लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रदेश सह संयोजक प्रसाद वक्ते पाटील यांनी ‘‘शिल्पा गोडबोले, सुषमा दाते यांच्यासह सर्वांनी काँग्रेसला मतदान केले आहे. त्यामुळे आता डंके के चोप पे बालभारती पौडफाटा रस्ता झालाच पाहिजे अशी पोस्ट एक्स या सोशल मीडिया माध्यमावर टाकली. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत याचा निषेध केला.

Medha Kulkarni
Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा हात हातात घेऊन... ; शाहांसोबत झालेली चर्चा जशीच्या तशी ठाकरेंनी सांगितली...

यावर खासदार मेधा कुलकर्णी Medha Kulkarni यांनीही पर्यावरण प्रेमींचा बाजू घेतली. ‘‘हा रस्ता व्हावा की नाही याबद्दल ॲकॅडमिक चर्चा होऊ शकते. परंतु ज्या ‘पुणे ४’ ने कायम साथ दिली आहे, त्यांच्याबद्दल अशी विधाने केल्यास कृतघ्नपणाचा दोष नक्कीच लागेल. मोठ्या रांगा लावून हे लोक भाजपच्या उमेदवारांना निवडून देत आले आहेत. मला वाटते पुण्यामध्ये अनेक सुजाण व तज्ज्ञ आहेत. ज्यांचे पुण्यावर प्रेम आहे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांच्याशी मुद्द्यांवर आधारित चर्चा व्हायला हवी.’’ असे उत्तर कुलकर्णी यांनी वक्ते पाटील यांना दिले. त्यानंतर वक्ते पाटील यांनी ती पोस्ट डिलीट केली. अनेकांनी वक्ते पाटील यांच्या या भूमिकेवर टीका करत कुलकर्णी यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सुषमा दाते म्हणाल्या, ‘‘वेताळ टेकडीसह शहरातील कोणत्याही टेकडीसंदर्भात आम्ही अभ्यास करूनच विषय मांडत असतो. जर कोणाला यावर शंका किंवा आक्षेप असेल तर चर्चा करून त्यांना मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. मेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार.’’

(Edited by Sunil Dhumal)

Medha Kulkarni
Bhavesh Bhinde Arrested: मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com