Ashish Shelar, Sharad Koli Sarkarnama
मुंबई

BJP Vs Thackeray Group : फडणवीस हे गद्दारांचे हृदयसम्राट ; ठाकरे गटाचं शेलारांना सडेतोड उत्तर...

Strong criticism of deputy leader Sharad Koli : उपनेते शरद कोळी यांची जोरदार टीका.

Amol Sutar

BJP Vs Thackeray Group : बोरिवलीतील मागाठाणे येथील एका कार्यक्रमात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईचे हृदयसम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या फडणवीसांच्या या कौतुकाची चांगलीच चर्चा रंगली होती. पण त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

तर फडणवीस हे गद्दारांचे हृदयसम्राट असल्याची टीका त्यांनी केली. आशिष शेलार यांनी मुंबईच्या विकासकामावरून देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली होती. मुंबईतील वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी 9 मेट्रो रुळ कोणी केले? मुंबईचा कोस्टल रोड कोणी केला? मुंबईच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची कोणी वाढवली? मुंबईच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट कोणी दिली? पाणी टॅक्समध्ये सूट कोणी दिली? एसआरएमध्ये अडकलेल्या लोकांना दिलासा कोणी दिला? असे अनेक प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थितांना विचारले होते.

त्यावेळी सर्वांनी देवेंद्र फडणवीस असा नामघोष केला. त्यावर मुंबईच्या विकासाच्या इतिहासाची पार्श्वभूमी पाहिली तर खऱ्या अर्थाने मुंबईचे हृदयसम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, असे शेलार म्हणाले होते. त्यांना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, "भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, हे आज सिद्ध झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेलार म्हणतायत देवेंद्र फडणवीस मुंबईचे हृदयसम्राट आहेत. आहो आशिष शेलार साहेब तुमच्या डोक्यात काही मेंदूचा भाग आहे की नाही. का तुमचा मेंदू सडलेला आहे. देवेंद्र फडणवीस हे गद्दारांचे हृदयसम्राट आहेत. असं म्हटल तर चांगल वाटेल परंतु देवेंद्र फडणवीस या जन्मात काय पुढच्या जन्मात देखील मुंबईचे हृदयसम्राट होणार नाहीत, हे लक्षात ठेवा" असे शरद कोळी म्हणाले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT