Devendra Fadnavis-Nawab Malik  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis-Nawab Malik फडणवीस-मलिक पुन्हा समारोसमोर; फडणवीसांनी साधला संवाद, मलिकांचा हात जोडून नमस्कार

Assembly session 2024 : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते तुरुंगात गेले. गेल्या वर्षी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नबाव मलिक आमने सामने आले होते. विधीमंडळात आज पुन्हा ते समारोसमोर आले होते.

Pradeep Pendhare

Mumbai, 09 July : भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमने-सामने आले. फडणवीस यांनी त्यांच्याकडे पाहून संवाद साधताच नवाब मलिक यांनी हसून आणि हात जोडून त्याला प्रतिसाद दिला. फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात तुरुंगात जावे लागले हेाते. सध्या ते वैद्यकीय रजेवर बाहेर आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिकबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिले. नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी हा सर्व राजकीय घटनाक्रम घडला होता. त्यानंतर हे दोघे नेते आज पुन्हा मुंबईतील विधिमंडळ अधिवेशनात पायऱ्यांवर आमने-सामने आले.

नागपूर अधिवेशनापूर्वी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप झाले होते. राज्यात महायुतीचे सरकार होते. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी नवाब मलिक हे तुरुंगात होते. नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कोणाबरोबर जातात याची, उत्सुकता होती.

नवाब मलिक नागपूर अधिवेशनात सहभागी होणार होते. तत्पूर्वी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करून घेण्यास नकार दिला. देवेंद्र फडणवीस यांचे हे पत्र समाज माध्यमांवर त्यावेळी तुफान व्हायरल झाले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रामुळे त्यावेळेस अजितदादांची कोंडी झाली होती. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना युती सरकारमध्ये सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी पत्राद्वारे फडणवीस यांनी अजितदादांकडे केली होती. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक हे नागपूरमध्ये अधिवेशन काळात आमने-सामने आले होते. त्यावेळी ही दोघांनी एकमेकांना अभिवादन केले होते. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांकडून मतांची जुळवाजुळवा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सर्व आमदारांची बैठक देवगिरी बंगल्यावर घेतली. या बैठकीला आमदार नवाब मलिक हे देखील उपस्थित होते.

नबाब मलिक यांच्या हजेरीवरून महाविकास आघाडीने महायुतीवर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्याकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेला नाही. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या बैठकीतील उपस्थितीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यातच आज हे दोघे विधिमंडळ इमारतीच्या पायऱ्यांवर आमने-सामने आले होते. देवेंद्र फडणवीस कामकाजात सहभागी होण्यासाठी पायऱ्यांवरून पुढे जात असताना तेथेच आमदार नवाब मलिक उभे होते. देवेंद्र फडणवीस यांना इतर लोक भेटत होते. ते त्यांच्याशी संवाद साधत पुढे चालले होते. त्याचवेळी त्यांचे लक्ष नवाब मलिक यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याशी काहीसा संवाद साधला. यावर नवाब मलिक यांनी हसत त्यांना हात जोडून नमस्कार घातला. आमदार नवाब मलिक यांचा हा नमस्कार आगामी राजकीय जुळवा-जुळवीचा, तर नाही ना!, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT