Chandrapur Assembly Election : खासदार प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूरसाठी पुन्हा लावली ‘फिल्डिंग’; विधानसभेसाठी बडा मासा गळाला!

Congress Candidate : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ काँग्रेसला जिंकता आलेला नाही.
MP Pratibha Dhanorkar-congress
MP Pratibha Dhanorkar-congress Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 09 July : एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला पक्षात आणून काँग्रेसने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच आपला उमेदवार निश्चित केला आहे. सुधाकर अंबोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ (Chandrapur Assembly Constituency) अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ काँग्रेसला (Congress) जिंकता आलेला नाही. भाजपचे (BJP) नागपूरकर असलेले नाना श्यामकुळे या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार होते. मात्र, मनापासून चंद्रपूरमध्ये (Chandrapur) कधीच रमले नाहीत. त्यामुळे त्यांनी मतदारांची नाराजी ओढावून घेतली होती.

मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी त्यांचा पराभव करून कायमचे परतीचे तिकीट काढून दिले. आमदार जोरगेवार महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे फिरत असतात. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे काँग्रेसमधून त्यांचा पत्ता आता जवळपास कट झाला आहे.

दुसरीकडे, त्यांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबतही फारसे सख्य नाही. त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला असला तरी मुनगंटीवार यांच्यासोबत त्यांचे फार काही पटत नाही. ते सहजासहजी जोरगेवार यांना भाजपत प्रवेश देतील, असे दिसत नाही.

MP Pratibha Dhanorkar-congress
Assembly Session : भास्कर जाधवांनी खिंडीत गाठलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या मदतीला आशिष शेलार धावले

दुसरीकडे, काँग्रेसही सक्षम उमेदवाराच्या शोधात होती. आता त्यांना सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अंबोरे सापडले आहेत. त्यांच्यासोबत व्यावसायिक राहुल तायडे यांनीसुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने पक्ष प्रवेश झाल्याने अंबोरे यांचे तिकीट सध्यातरी पक्के मानले जात आहे. असे असले तरी अंबोरे यांच्या पक्ष प्रवेशाने अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे आणि इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

मागील निवडणुकीत काँग्रेसचे महेश मेंढे यांना फक्त १५ हजार मते मिळाली होती. प्रवीण पडवेकर, बाळू खोब्रागडे, डॉ. राजेश कांबळे हे सध्या चंद्रपूरमधील इच्छूक उमेदवार आहेत. दुसरीकडे अंबोरे यांना विद्यमान आमदार जोरगेवार आणि भाजपचे संभाव्य उमेदवार या दोघांसोबत लढत द्यावी लागणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

MP Pratibha Dhanorkar-congress
Rohit Pawar Predictions : आगे आगे देखो होता है क्या'; पिंपरी, भोसरीतील राजकीय उलथापालथीचे रोहित पवारांकडून संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com