Devendra Fadnavis News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : 'मराठा आंदोलनावेळी माझ्याविरुद्ध कारस्थानाचे पुरावे, योग्यवेळी बाहेर काढणार..' ; फडणवीसांचा इशारा...

Chetan Zadpe

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाने) आपली प्रतिमा मलिन करण्याचे आणि टार्गेट करण्याचे डाव आखले होते, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. इतकेच नाही तर या सर्व कट कारस्थानाचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे पुरावे आपण योग्यवेळी बाहेर काढू असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

दवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका यु ट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत फडणवीसांना हा गंभीर आरोप केला आहे. "मनोज जरांगे पाटलांचं जे आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक नेत्यांनी माझ्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला.

हे मला तर पुराव्यासहित माहिती आहे. शरद पवार गट राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी माझ्याविरुद्ध वॉररूम्स सुरू केल्या आणि या वॉररूम्सचं एकच काम होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं, माझ्या विरोधात कंटेट क्रिएट करणं," फडणवीस म्हणाले.

(राजकराणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे व्हाट्स अॅप चॅनेल फॉलो करा)

माझ्याविरोधात वॉररुम्स -

"आम्ही हे वॉररूम्स संभाजीनगर मधून शोधून काढल्यानंतर त्यांनी ते नवी मुंबईला (Mumbai) शिफ्ट केली. तिथेही आम्ही ती शोधून काढली. यानंतर अचानक माझ्या विरोधातला कंटेट कमी झाला. हे काही आंदोलनाशी संबंधित लोक नव्हते. हे प्रोफेशनल अपाईंटेड टू डिमॉलिश फडणवीस, या साठी हे लोक होते. ते ऑरगॅनिक नसल्यामुळे ते टिकू नाही शकले," असेही फडणवीस म्हणाले.

योग्यवेळी पुरावे बाहेर -

"प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपण आता निवडणुकीच्या फेजमध्ये आहोत. योग्य वेळी याचे पुरावे बाहेर काढणार. जेव्हा मी म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे, तेव्हा तो माझ्याकडे असतोच. मी हवेत तीर चालवणाऱ्यांपैकी नाही. इतके वेगवेगळे प्रकारचे पुरावे तयार करून ठेवले आहेत. योग्यवेळी मी बाहेर काढीन, असा इशाराही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT