Loksabha Election : PM मोदी-उद्धव ठाकरेंचे एकमेकांविषयी प्रेम, बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Narendra Modi : मोदींनी केलेल विधानामुळे भविष्यात उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात जवळीक निर्माण होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता फडणवीस म्हणाले,उद्धव ठाकरेंच्या सोबत जवळीकता निर्माण होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama

Loksabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर काही संकट आले तरी आपण मदत करायला सर्वात पुढे असू म्हटले होते. उद्धव ठाकरे हे जेव्हा आजारी होते तेव्हा रश्मी ठाकरेंना आपण रोज फोन करून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करत असल्याचे मोदींनी म्हटले होते. मोदी या वक्तव्यातून उद्धव ठाकरेंच्या समोर मैत्रीचा हात पुढे करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्यासोबत मोदी जातील का नाही हे सांगून टाकले आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Dharashiv Loksabha 2024 : धाराशिव जिंकायचंच ! उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला; ओमराजेंना सहा सभांचं बळ, पण...

आम्ही केवळ वैचारिक विरोधक आहोत.तरीही उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आजारी असताना मोदीजी रश्मी ठाकरे यांना फोन करून विचारपूस करत होते. वैयक्तीकदृष्टा काही मदत लागली तर मोदी करतील मात्र उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या कोणतीही मदत मोदी करणार नाहीत,असे स्पष्ट देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींनी केलेल विधानामुळे भविष्यात उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात जवळीक निर्माण होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता फडणवीस म्हणाले,उद्धव ठाकरेंच्या सोबत जवळीकता निर्माण होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.

उद्धव ठाकरेंचे मोदींना उत्तर

उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावण्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ठाकरे म्हणाले, मला लोक फोन करून सांगतात मोदींना तुमच्यावर प्रेम आलय. पण मोदींचा मला विचारायचे आहे तुम्हाला जे कळते ते तुमच्या खालच्या लोकांना कळत नाही का? मी गंभीर आजारी असताना त्यांनी माझे सरकार पाडले. हा उद्धव ठाकरेही तुमच्यावर काही संकट आले तर पहिल्यांदा धावून जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com