Devendra Fadnavis News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : 'मांडवलीसाठी माणूस पाठवला; देशमुखांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "योग्य वेळी..."

Chetan Zadpe

Mumbai News : माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी महाविकास आघाडी सरकारात गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. या प्रकरणी देशमुख यांना वर्षभराचा काळ तरुंगात काढावे लागले. ईडीने त्यांच्यावर कडक कारवाई केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणात आता देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांचे प्रत्यक्ष नाव न घेता खळबळजनक दावे केले आहेत. यावर फडणवीसांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाव घेता काही दावे केले आहेत. आपल्या कुठल्या परिस्थितीत या सर्व काळात जावं लागलं. तसेच आपल्याशी या सर्व प्रकरणामध्ये समझोता करण्यासाठी फडणवीसांनी एक माणूस आपल्याकडे पाठवला होता, असा दावा देशमुखांनी केला आहे. यावर आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका वृत्तवाहिनीशी संवाध साधताना देशमुखांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते सर्व कपोलकल्पित गोष्टी सांगत आहेत. पण बरंचसं सत्य माझ्याजवळ आहे. हे सर्व मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे. आज निवडणुका असल्यामुळे त्यांना या निमित्ताने सणसणी पसरवायची आहे. मात्र ज्या वेळेला मी सत्य बाहेर काढेन, त्यावेळी त्यांच्या चांगलं लक्षात येईल. आज मी याच्यावर काही जास्त मी बोलू इच्छीत नाही. (Latest Marathi News)

योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार -

या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली आहे, ज्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप होता. त्याचं सरकार तेव्हा होते. ते सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्या याच कालावधीत फॉर्मचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झालेला आहे. यामध्ये त्यांनी मला काय काय निरोप पाठवले, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहे. काही काळजी करण्याचं कारण नाही, योग्यवेळी जे सत्य आहे ते बाहेर काढणार आहे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT