Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय'; फडणवीसांची खरमरीत टीका!

Mumbai Political News : "देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते."

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शा‍ब्दिक युद्ध दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जाऊ लागले आहे. याची प्रचिती शनिवारी या दोघांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरातून आली. देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याच वेळी 'गेट वेल सून' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिणवले. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरुपाची प्रकरणे घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, त्यांना कलंक, फडतूस सौम्य वाटेल पण देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण झाले आहेत, असे म्हटले होते. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची गेल्या काही दिवसातील विधाने बघून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे दिसते, असे म्हटले. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना गेट वेल सून म्हणत हिणवले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

राज्यात गोळीबाराच्या वाढत्या घटनेवर उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात महेश गायकवाडवर गोळीबार केला, तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर माॅरिस नावाच्या व्यक्तिने गोळीबार करत त्यांची हत्या केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी कायदा सुव्यवस्थेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. 'मी पूर्वी त्यांना कलंक, फडतूस म्हणायचो ते फार सौम्य होते. कालच्या त्यांच्या 'श्वान'च्या प्रतिक्रियेनंतर राज्याला लाभलेले गृहमंत्री फडणवीस हे मनोरुग्ण आहेत, असे मला वाटत आहे,' असा घणाघाती हल्ला ठाकरेंनी फडणवीसांवर केला होता.

फडणवीसांच्या कोणत्या वक्तव्यावर वादंग?

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी श्वानाचा उल्लेख करत टीका केली होती. "एखाद्या वाहनाखाली श्वान (कुत्रा) आला तरी त्या घटनेमुळे विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील," असे फडणवीस म्हणाले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT