Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शब्दांनी सत्ताधारी नेत्यांना सडकून काढतात. शालजोडे मारत आपल्या टोमण्यांनी घायाळ करतात. शाब्दिक कोट्या करत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कायम निशाण्यावर असतात. यावर फडणवीसांनी त्यांचा टोमणे बहाद्दर असा उल्लेख केला आहे. तसेच फडणवीसांनी त्यांना विकासकामांना फाटा देऊन भलतेच काहीतरी बोलण्यात ते पटाईत असल्याचा टोलाही लगावला आहे. Fadnavis Vs Thackeray
मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून, असे फडणवीसांनी म्हटल्याने ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्यावर तोफ डागली होती. दिल्लीत असलेल्या फडणवीसांना यावर छेडले असता त्यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. तसेच मुंबईतील विकासकामांवरून ठाकरेंना ओपन चॅलेंजही दिले. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ठाकरे हे टोमणे बहाद्दर आहेत. त्यांना मी दिलेली ही उपमा ते सार्थ करून दाखवतात. त्यांनी विकासकामावर एकच वाक्य बोलून दाखवावे. 25 वर्षांत त्यांनी काय केले, याबाबत त्यांनी जाहीरपणे सांगावे. मी 25 कामे सांगतो. मुद्दाचे सोडून इतर गोष्टींवर बोलून हेडलाईन मिळवणे, एवढेच एक काम ठाकरे करत असतात, असा घणाघात फडणवीसांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातारा लोकसभेच्या जागेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. खासदार उदयनराजे आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यावर दावा सांगितला आहे. दरम्यान, आक्रमक भूमिका घेत उदयनराजेंनी (Udayanraje) थेट दिल्ली गाठली असून इकडे पाटलांनी फडणीस आणि बावनकुळे मला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. या पेचावर फडणवीस म्हणाले, उदयनराजे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भेट होणार आहे. त्या भेटीत उदयनराजे आपली भूमिका मांडतील. त्यानंतर शाह त्यांच्या उमेदवारीवर निर्णय घेणार आहेत.
मराठा आंदोलकांवर दाखल केसेसे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले. ते म्हणाले. आंदोलनाच्या केसेस दाखल मागे घेणार असून जाळपोळ, तोडफोड आणि पोलिसांवर हल्ल्यातील केसेस मागे घेणे शक्य नाही. राज्यात एकूण 492 केसेस आहेत. त्यांची छाननी सुरू असून त्यातील 172 केसेस मागे घेण्याबाबत शिफारसही झालेली आहे. मात्र सहा केसेस अशा आहेत त्यांची शिफारस पोलिसांनी नाकारलेली आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.