Uddhav Thackeray devendra fadnavis aaditya thackeray sarkaranama
मुंबई

Uddhav Thackeray News : "आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, पण...", ठाकरेंचा मोठा दावा

Uddhav Thackeray On Narendra Modi : "नोटबंदीनंतर मला 100 दिवस द्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. एप्रिल 2024 मध्ये 2700 दिवस झाले, त्याचं काय झालं?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Akshay Sabale

साल 2019. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. पण, सत्तेचं सम-समान वाटप करण्याचं शब्द गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी 'मातोश्री'त दिल्याचा दावा करत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी भाजपबरोबर युती तोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, शिवसेनेत फूट पडल्यानं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

"आदित्यला ( Aaditya Thackeray ) मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं," असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेचं सम-समान वाटप होईल. शिवसेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद पद असेल, असं अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरलं होतं. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं."

"भाजप हा पक्ष वॉशिंग मशिन आहे. त्यांनी प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण आणि अजित पवारांसारख्या भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन क्लीन चिट दिली आहे. पक्ष तोडणे, घर तोडणे, छापे मारणे ही भाजपची हमी आहे. नोटबंदीनंतर मला 100 दिवस द्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. एप्रिल 2024 मध्ये 2700 दिवस झाले, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं मोदींनी सांगितलेलं. पण, केवळ शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला," अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT