Aaditya Thackeray News : 'महाराष्ट्रात मोदी नाही ठाकरे गॅरंटी चालते', आदित्य ठाकरेंनी सुनावले

Narendra Modi : जागावाटपाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी महायुतीला टार्गेट केले. महाविकास आघाडीमध्ये सगळेच एकत्र काम आम्ही करतोय. आमची ताकद जास्त आहे म्हणून खेचाखेच सुरू आहे. मात्र, महायुतीमधील भांडण काही सुटत नाही.
 Narendra Modi Aaditya Thackeray
Narendra Modi Aaditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : भाजपच्या प्रचारामध्ये 'मोदी गॅरंटी'चा उल्लेख केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान मोदीदेखील आपल्या भाषणामध्ये मोदी गॅरंटीचा उल्लेख करून मतदारांना त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होणारच असे सांगत आहेत. मोदी गॅरंटीच्या विरोधात काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात 'न्याय गॅरंटी' दिली आहे. भाजपच्या BJP आक्रमक प्रचार रणनीतीला शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

 Narendra Modi Aaditya Thackeray
Lok Sabha Election 2024 : शिंदे की भाजप, ठाणे नेमकं कोणाकडं? इच्छुकांची धाकधूक वाढवली

'आम्ही सगळे प्रचार करत आहोत. आम्ही केलेलं काम जनतेपर्यंत नेत आहोत. मोदी गॅरंटी नाही तर महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते. या देशात नारे खूप दिले जातात मात्र देशभरात एक वेगळी लाट वाहू लागली आहे. देशात परिवर्तनाची वारे वाहू लागले आहे,' असा टोला आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) विरोधकांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी महायुतीला टार्गेट केले. महाविकास आघाडीमध्ये सगळेच एकत्र काम आम्ही करतोय. आमची ताकद जास्त आहे म्हणून खेचाखेच सुरू आहे. मात्र, महायुतीमधील भांडण काही सुटत नाही. त्यांना उमेदवार मिळत नाही. जे आहेत तेदेखील उभ राहायला तयार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाऊसाहेब वाकचौरे स्वतःहून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात आले. त्यांनी गद्दारी नाही केली. आता परत येऊन ते काम करताहेत. मतभेद विसरून ते परत आलेत, असा म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांची पाठराखण केली. नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्याने आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले. राणे यांना उमेदवारी मिळाली यापुढे चाळीस लोकांनी पुढचा विचार करावा, असा टोलादेखील आदित्य ठाकरेंनी लगावला.

R

 Narendra Modi Aaditya Thackeray
Sanjay Raut: राऊतांनी राणांना पुन्हा हिणवलं; नटीला नटी नाही तर काय म्हणणार? गणपत पाटलांना प्रेमाने नाच्या म्हणतोच की...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com