Devendra Fadnavis On Nishikant Dubey  Sarkarnama
मुंबई

Nishikant Dubey: ठाकरे बंधू अन् मराठी माणसाला ठरवून टार्गेट करणाऱ्या निशिकांत दुबेंना फडणवीसांनी फटकारलं; म्हणाले...'

Nishikant Dubey News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. याचदरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना सातत्याने टार्गेट करताना पाहायला मिळालं होतं.

Deepak Kulkarni

थोडक्यात बातमी :

  1. मुख्यमंत्र्यांचा इशारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना त्यांच्या मुंबईविरोधी आणि मराठीविरोधी वक्तव्यांवर चांगलंच सुनावलं.

  2. हिंदी-विरुद्ध-मराठी वाद पुन्हा पेटला: दुबे यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषिकांमधील वाद उफाळून आला आहे.

  3. भाषावादाचं राजकारण फेल होईल: फडणवीस यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात कोणताही भाषिक वाद नाही आणि मतदारच निवडणुकीत योग्य उत्तर देतील.

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. याचदरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना सातत्याने टार्गेट करताना पाहायला मिळालं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर आणि संसदेत महाराष्ट्रातल्या खासदारांनी घेरल्यानंतरही पुन्हा निशिकांत दुबे यांनी मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान असल्याचे विधान केलं. याच त्यांच्या वक्त्व्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशिकांत दुबे चांगलंच झापलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सोमवारी(ता.4) सातत्यानं महाराष्ट्र,मुंबई आणि ठाकरे बंधूंना डिवचणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना (Nishikant Dubey) खडेबोल सुनावले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुबेंनी अशाप्रकारची वक्तव्ये करु नयेत. इथली परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं ठणकावलं आहे.

फडणवीस म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. इथले मराठी आणि अमराठी सुरक्षित आहेत. सगळे एकमेकांसोबत योग्यप्रकारे नांदत आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठलाही मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाही. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगत त्यांनी दुबेंसह ठाकरे बंधूंनाही टोला लगावला आहे.

तसेच मराठी आणि अमराठी लोकं जाणीवपूर्वक वाद निर्माण करणार्‍यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला निशिकांत दुबेंना असा असेल की, त्यांनी या विषयामध्ये कुठलेही वक्तव्य करु नये," असंही फडणवीस म्हणाले.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'हिंदी विरुद्ध मराठी'चा राजकीय वाद पेटला आहे. दुबे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपेल," असा दावा केला आहे.

याच मुलाखतीत त्यांनी मुंबईच्या निर्मिती आणि अर्थकारणात उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान असल्याचा जुना मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला. आमचे मुंबईच्या अर्थकारणात तितकेच योगदान आहे. मग आम्हाला मारहाण का केली जाते?", असा सवालही दुबे यांनी उपस्थित केला होता.

यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना मुंबईतील मतदारांची टक्केवारीही मांडली. मुंबईत फक्त 30 टक्के लोक मराठी बोलतात, 30 टक्के लोक हिंदी बोलतात, तर उर्वरित लोक राजस्थानी, गुजराती आणि भोजपुरी बोलतात. त्यामुळे ठाकरे बंधूंचे भाषिक राजकारण यावेळी अपयशी ठरेल, असं भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं होतं.

  1. प्रश्न: फडणवीस यांनी निशिकांत दुबेंना काय सांगितलं?
    उत्तर: त्यांनी दुबेंना भाषिक वाद न भडकवण्याचा सल्ला दिला आणि अशा विधानांपासून दूर राहायला सांगितलं.

  2. प्रश्न: निशिकांत दुबेंनी नक्की काय विधान केलं?
    उत्तर: त्यांनी मुंबईच्या विकासात हिंदी भाषिकांचं योगदान मोठं असल्याचं आणि ठाकरे बंधूंचं राजकारण संपेल असं म्हटलं.

  3. प्रश्न: फडणवीसांचं भाषिक वादावर मत काय आहे?
    उत्तर: महाराष्ट्रात मराठी-अमराठी असा कोणताही वाद नाही आणि सर्व लोक शांततेत राहतात असं त्यांनी स्पष्ट केलं.

  4. प्रश्न: मुंबईतील भाषिक लोकसंख्येचा मुद्दा का चर्चेत आला?
    उत्तर: दुबेंनी मराठी लोकसंख्या ३०% असल्याचं सांगून ठाकरे बंधूंचं भाषिक राजकारण फेल होईल असा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT