Uddhav Thackeray : मुंबईतील ‘डॅमेज कंट्रोल’साठी मातोश्रीवर तातडीची रणनिती; उद्धव ठाकरे उतरणार थेट मैदानात !

BMC Election: मुंबईतील हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी थेट 'मातोश्री'वरून हालचाली सुरु आहेत. येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये म्हणून पक्षातील पडझड रोखण्यासाठी आता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सक्रिय भूमिका स्वीकारली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसातच होणार आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. मुंबई पालिका ही एकसंध शिवसेनेचा गड राहिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुंबई पालिकेतील आतापर्यंत ४५ नगरसेवक एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. त्यामुळे मुंबईतील हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी थेट 'मातोश्री'वरून हालचाली सुरु आहेत. येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये म्हणून पक्षातील पडझड रोखण्यासाठी आता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सक्रिय भूमिका स्वीकारली आहे.

तीन वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत. विशेषता येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक साथ सोडत आहेत. त्यामुळे आता हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी मातोश्रीवर नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवकाना सूचना करण्यात आल्या असून त्यासाठी वेगळी रणनीती या बैठकीत आखण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
BJP Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजप ठाकरेंना धक्का देणार! शिंदेंचीही अडचण वाढवणार; इन्कमिंग सुरू, महापौरपदासाठी स्वबळाचे संकेत

दोन दिवसापूर्वीच मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. आणखी एका नगरसेवकाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना अलर्ट झाली आहे. प्रतीक्षानगर भागातील माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने या ठिकाणी मोठा राडा झाला. या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्या युतीचा सस्पेन्स संपला! राज ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर....'

मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. उद्धव ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आपली ताकद मुंबईतही असून ठाकरेंची ताकद कमी झाल्याचे दाखवण्याचे प्रयत्न आता शिंदे गटाकडून सुरू आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असूनही ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरू आहे. आता पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वत: डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत.

Uddhav Thackeray
Raj-uddhav Thackeray brothers alliance : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआचे काय होणार? माजी मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही रणनिती आखली जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका या गणेशोत्सवानंतर होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटातील आऊटगोईंग आणि शिंदे गटातील इनकमिंग थांबल होते. त्यातच एका नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रणनीती आखली जात आहे.

Uddhav Thackeray
BJP vs Prahar : 'नौटंकी' कोण करीत आहे? बावनकुळे-बच्चू कडू यांच्यात जुंपली

पक्षातील पडझड रोखण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सक्रिय भूमिका स्वीकारली आहे. नुकतेच सायन प्रतीक्षा नगर येथील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीनंतर ठाकरे यांनी स्थानिक शाखेत थेट फोन करून शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यासोबतच शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात ज्या वॉर्डांतील माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे, त्या भागातील उर्वरित शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे आता थेट संवाद साधणार आहेत.

Uddhav Thackeray
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंचं ‘वन टू का फोर’; मुंबईसाठी माजी नगरसेवकांच्या 'कुमक'ची जुळवाजुळव

ठाकरेंच्या शिवसेनेकडून वेगळे प्लॅनिंग

यासाठीचे खास प्लॅनिंग केले जात आहे. त्यासोबतच प्रत्येक विभागात बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे थेट संवाद साधून संघटना बळकट करण्यासोबत स्थानिक शिवसैनिकांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील बहुसंख्य शिवसैनिक हा मातोश्रीसोबत राहिला होता. त्यामुळे आता याच शिवसैनिकांच्या मदतीने उद्धव ठाकरे आता मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामाची तयारी करत आहेत.

Uddhav Thackeray
Devendra fadnavis : कोकाटेंना दणका, तरीही मंत्री बिनधास्त; शिस्तप्रिय फडणवीसांनाच आव्हान...

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईवरही आपले लक्ष केंद्रीत केले. मुंबईतील काही आमदारांनी शिंदे यांना बंडात साथ दिली. त्यानंतर शिंदे यांनी आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळवला आहे. एकनाथ शिंदे गटाने ठाकरे गटाचे 45 नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत. हे नगरसेवक मागील टर्मचे आहेत. तर, दुसरीकडे आतापर्यंत भाजप वगळता इतर पक्षातील 125 माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात यापेक्षा अधिक नुकसान होऊ नये यासाठी ठाकरे यांची शिवसेना प्रयत्न करीत आहे.

Uddhav Thackeray
Sanjay Shirsat controversy : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जातेय? संजय शिरसाटांचे पुन्हा वादग्रस्त विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com