Devendra Fadnavis, Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis: बॅग तपासली तर एवढं काय घाबरताय? अरे होतं काय घबाड? ; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray over Bag Checking Issue: "दोन दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली करत आहेत. अरे होतं काय घबाड? एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? असा सवाल फडणवीसांनी ठाकरेंनी केला.

Mangesh Mahale

Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वणी आणि धाराशिव येथे सभा झाली. सभा घेण्यासाठी गेले असताना त्यांची दोन वेळा बॅग तपासणी करण्यात आली. त्यांचा व्हिडिओ ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाही, असा सवाल केला आहे. ठाकरे यांच्या बॅग तपासणी प्रकणारवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी फडणवीसांचा मंगळवारी ठाण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी वादाला 'फोडणी' दिली. जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीस यांनी ठाकरेंवर तोफ डागली. "दोन दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली करत आहेत. अरे होतं काय घबाड? एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? असा सवाल फडणवीसांनी ठाकरेंनी केला.

"आता बॅगा तपासल्या तर काय झालं? त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय? अरे माझी बॅग तपासली ना! नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली. आम्ही नाही त्याचा इश्यू केला. आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो तर आमच्या बॅगा तपासतात. आमच्यासोबतच्यांच्या बॅगा तपासतात. "बॅग तपासतात, बॅग तपासतात" असं म्हणत आम्ही नाही रडारड केली. यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत. आता रडारड करण्याची वेळ आली आहे. रडारड करुन मतं मागण्याचं काम हे लोक करीत आहेत," असे फडणवीस यांनी सांगितले.

मतदारांना पैसे, भेटवस्तू किंवा अन्य आमिषे दाखविण्यात येऊ नयेत, यासाठी निवडणूक आयोगाकडून तपासणी केली जात आहे. उद्धव ठाकरे सोमवारी (११ नोव्हेंबर) यवतमाळमधील वणी येथे सभा घेण्यासाठी आले असताना त्यांची पहिल्यांदा बॅग तपासण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी लातूर जिल्ह्यात औसा येथे आले असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅगे तपासली.

आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी सभा घेण्यासाठी आले असताना नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT