Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : लोकसभेसाठी अजित पवार गटाची डिमांडवर डिमांड; फडणवीसांनी थेटच दाखवला आरसा

Lok Sabha Election 2024 : आमचे 115 आमदार असले तरी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. आम्ही शिंदेंच्या पाठीमागे पूर्णपणे असून, मुख्यमंत्री म्हणून आमचे समर्थन त्यांना आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांत जागावाटपावरून खडाखडी सुरू असल्याचे चित्र आहे. अशातच महायुतीच्या जागावाटपाचे दोन फॉर्म्युला तयार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात भाजपला 34 किंवा 37, शिवसेनेच्या शिंदे गटाला 8 किंवा 10 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला 3 किंवा 4 जागा देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला.

महायुतीत शिवसेनेने 23 जागांची मागणी केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 12 जागांवर ठाम आहे. यास भाजप तयार नसल्याने जागावाटपाचा तेढ वाढलेला आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशी दोन वेळा चर्चा केली. मात्र, काही जागांबाबत अद्यापही निर्णय होताना दिसत नाही. दरम्यान, लोकसभेच्या जागा कमी मिळत असल्याने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. तसेच अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असे विधान केले. यावर फडणवीस म्हणाले, आता कुणी काहीही मागायला हरकत नाही, पण जागावाटपाचा निर्णय वास्तविकतेवरच होईल. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा काय फॉर्म्युला ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, रामदासभाईंना अशी टोकाची विधाने करण्याची सवय आहे. त्यांनी मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की, भाजपने शिवसेनेचा सन्मानच केलेला आहे. आमचे 115 आमदार असले तरी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. आम्ही शिंदेंच्या पाठीमागे पूर्णपणे असून मुख्यमंत्री म्हणून आमचे समर्थन त्यांना आहे. महायुतीतील सर्व पक्षांना सन्मान देऊनच निवडणुकांना सामोरे चाललो आहोत. पुढेही त्यांचा सन्माच ठेवणारच आहोत. मात्र, अनेक लोक वारंवार आमचे लक्ष वेधून घेण्यासाठी टोकाची भूमिका घेतात. आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्यांना गंभीरतेने घेऊ नये, असा टोलाही त्यांनी कदमांना लगावला.

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी दम दिला आहे. यावर फडणवीस म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) राजकारणात 55 वर्षांहून अधिक काळ आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. त्यांना मी काही सल्ला देऊ शकत नाही. मात्र, त्यांनी विधानाचा पुनर्विचार करावा. ते खूप मोठ्या उंचीवर आहेत, याचा त्यांनी विचार करावा. ते अशा प्रकारे कुठल्या आमदाराला धमक्या देऊ लागले, तर त्यांचा स्तर खाली येईल. आणि मला वाटत नाही की कुठला आमदार त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देईल. त्यांचे म्हणणे मला योग्य वाटले नाही.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT