Chhagan Bhujbal News : जागावाटपावरून छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'आमची ताकदही शिंदे गटा...'

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जागा वाटपात तीन-चार जागांवर अजित पवार गटाचे समाधान होणार नाही
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Polical News : महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तीन ते चार जागा मिळतील, हा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फेटाळला आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा त्यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या विविध माहिती समोर येत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील. शिंदे गटाला दहा ते बारा जागा मिळतील, असे बोलले जाते. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाला तीन ते चार जागा मिळणार आहेत, असा दावा केला जातो. यावर भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेत हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हीदेखील राज्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. अतिशय उत्साहपूर्वक वातावरण आहे. विविध आमदारांनी मतदारसंघ सोडल्यास निवडणूक जिंकू, असा दावा केला आहे. दहा ते बारा लोकसभा मतदारसंघांमध्ये अशी अनुकूल स्थिती असल्याचे कार्यकर्त्यांनी राज्याच्या आढावा बैठकीत सांगितले. त्यामुळे आगामी जागावाटपाच्या बैठकीत वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis News : रामदास कदमांचे गंभीर आरोप फडणवीसांनी अगदीच हलक्यात घेतले

महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच आमदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेदेखील आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तीन ते चार जागांवर आमचे समाधान होणार नाही. याबाबतच्या चर्चा आणि बातम्यांत काहीही तथ्य नाही. आमचे तीन किंवा चार जागांवर समाधान होण्याची शक्यता नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात जागावाटपात अजित पवार गटाकडून अधिक जागांची मागणी होईल असे संकेत आहेत.

Chhagan Bhujbal
Fadnavis Vs Pawar : पवारांनी सज्जड दम भरल्यानंतर शेळकेंच्या मदतीला धावून आले फडणवीस; म्हणाले...

भुजबळ यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात जी विकासकामे झालेली आहेत. ती प्रामुख्याने माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलेली आहेत, अन्य कोणी काहीही दावा करीत असले तरी मतदारांना हे माहीत आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ मिळाल्यास उमेदवारीचादेखील विचार होऊ शकतो, असे संकेतही भुजबळांच्या वक्तव्यातून मिळत आहे.

लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. येत्या काही दिवसांत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवार असतील, असा दावा केला होता. आता या जागेवर भुजबळांनीही आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघावरून नवे राजकारण छेडले जाण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray : देशाला कुणी लुटलं, काँग्रेस की भाजपनं? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला 'पब्लिक'चं भन्नाट उत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com