Maharashtra politics latest : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार ३ मार्चापासून सुरू होत आहे. तत्पुर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पूर्वसंध्येस विरोधकांनी सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर आज बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला.
मुख्यमंत्री फडवणवीस(CM Fadnavis) म्हणाले, ‘’राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्च दरम्यान आपण करणार आहोत. हे नवीन सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. ज्याप्रमाणे अजितदादांनी सांगितलं की, आम्ही कुठेही अधिवेशन आटोपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता, व्यवस्थितपणे चार आठवड्यांचं अधिवेशन आयोजित केलं आहे.’’
तसेच ‘’आज विरोधी पक्षाने नऊ पानांचं पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये नऊ नेत्यांची नावे आहेत त्यात दोन नेत्यांनी स्वाक्षरीच केलेली नाही. एक नाव तर आम्ही शोधत आहोत की नेमके ते आमदार आहेत की नाही. म्हणजे ते असतील कदाचित पण आमच्या ते लक्षात येत नाही, आम्ही ते शोधण्यास पाठवले आहे.’’ असंही फडणवीस म्हणाले.
याशिवाय ‘’आपण बघितलं असेल की हम साथ साथ है, अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही. हम आपके है कौन सारखीच परिस्थिती तिथे आहे. कारण काँग्रेस पोहचलीच नाही. अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं पण वेळेपर्यंत काँग्रेस(Congress) आली नाही, रोहित पवारांनीही ट्वीट केलं आहे असं वाटतं, त्यांनीही काहीतरी नाराजी व्यक्त केली आहे. वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील कोणीच नाही. त्यामुळे एकुणच कशापद्धतीने विरोधी पक्षाचं कामकाज सुरू आहे हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी चहापानावर बहिष्कार घातला.’’ असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टोला लगावला.
याचबरोबर ‘’आता त्यांना ही संधी होती. कारण, जेव्हा नवीन सरकार बनतं. त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला एक सकारात्मक चर्चा आपण करूया, अशाप्रकारची ती संधी होती. त्यांनी संवाद स्थापित करावा असं पत्रकारपरिषदेत सांगितलं. पण संवादाचं सगळ्यात मोठं जे माध्यम होतं, आम्ही त्यांना चहापानास निमंत्रित केलं होतं, म्हणजे संवादालाच बोलावलं होतं. पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला. म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की, संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशाप्रकारे पत्रकारपरिषदेत म्हणायचं.’’ असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.