Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : "पुढील तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला असेल" : फडणवीसांचा दावा!

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis : 'सकाळ सन्मान सोहळा' या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी उपस्थिती लावली. मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी त्यांची फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईचा विकास या बद्दल सरकारचे नियोजन यावर सविस्तरपणे आढावा सांगितला.

फडणवीस म्हणाले, "तीनच वर्षात मुंबई बदललेली असेल. मेट्रो २ आणि मेट्रो ७ सुरू केली. पहिल्याच दिवसापासून त्याच्यातून लाख लाख प्रवासी प्रवास करत आहेत. इंटीग्रेशन आपण जे करतोय . मेट्रो ३ भुयारी मार्ग ४० किलोमीटरची आहे. ज्यावर खूप वाद सुरू आहे, आणि उद्धव ठाकरे सोबत बराच संघर्ष चालू होता. तीन वर्षे त्यांनी ती अडकून ठेवली होती. मात्र आता मार्ग मोकळा झाला, पुढच्या वर्षापर्य़ंत आम्ही ती सुरू करू. इंटरलँडला २२ किलोमीटरचा ब्रीज हा जोडला जाईल, अक्षरश: एक नवीन मुंबई, म्हणजे आताच्या मुंबईपेक्षा चार पट अशी मुंबई, ही चौथी मुंबई समजून घ्यावी आपण. चौथी मुंबई तयार करू. ही मुंबई भारताचा जो पुढचा ग्रोथ आहे असेल, असे फडणवीस म्हणाले.

"आताच्या मुंबईने भारताची आर्थिक राजधानी म्हणून गेली शंभर वर्षे भारताला एक ग्रोथ दिली. तशी पुढची शंभर वर्षे नवीन निर्माण होणरी मुंबई ही भारताला पुढील शंभर वर्षे ग्रोथ देईल. वाढवणला आपण बंदर तयार करतोय. यामुळेही पुढच्या शंभर वर्षाची ग्रोथ होणार आहे. एक राहण्यायोग्य मुंबई आपण तयार करतोय, असे फडणवीस म्हणाले.

'धारावीतल्या जवळपास एक लाख लोकांचं पुनर्वसन करायचं आहे. हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. धारावी आमच्याकरीता पैसा कमावण्याचा साधन नाही. धारावी हे ग्रोथ इंजिन देखील नाही. तिथे वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात. मी दहा-पंधरा वर्षे माझे जोडे आणि बॅग धारावीतूनच घ्यायचो. जगातले सगळेच ब्रँड तिथे मिळतात. इतकं चांगलं कौशल्य धारावीमध्ये आहे. या सर्वांना एक चांगली इको सिस्टीम द्यायची, असे फडणवीस म्हणाले.

ठबाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी श्रद्धेय आहेत. बाळासाहेब यांना पक्षाच्या पलीकडे फॉलोविंग आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे. कुठल्याही राजकारणापेक्षा त्यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे समृद्धी महामार्गाला त्यांचं नाव आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT