Politics :...अन्यथा लोक म्हणतील मुख्यमंत्री बदलला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं काम करण्यामागचं रहस्य

Politics : लोकांची कामं हेच माझं टॉनिक...
Eknath Shinde :
Eknath Shinde :Sarkarnama

Eknath Shinde : ''लोकांचा गराडा त्यांची कामं हेच माझं टॉनिक आणि ऊर्जा आहे. लोकांची कामे करावी लागणार आहेत. अन्यथा मुख्यमंत्री बदलला असे लोक म्हणतील. राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी त्या तीन दिवसांपैकी एक दिवसातील एक मिनिट देखील मी झोपलो नव्हतो'', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

''सध्या कामाचा भार आहेच. लोकांना भेटणे, प्रशासकीय कामे आणि विभागाच्या मीटिंग असतात. पण तरी देखील जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे झोप कमी मिळते'', असंही एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत आयोजित 'सकाळ' सन्मान सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

Eknath Shinde :
Satara : राजीनामा द्या, पुन्हा निवडून येवून दाखवा : शंभूराज देसाईंचे राऊतांना आव्हान

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे काम आम्ही केलं ते काम करण्याची गरज होती. मात्र, मागील अडीच वर्षात काय काम झालं? महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात फक्त इगोमुळे मेट्रोचे काम थांबले होते.

आमचं सरकार आलं आणि राज्यातील विकासाचे काम पटापट मार्गी लागले. त्यामध्ये समृद्धी महामार्गाचे काम असेल किंवा मेट्रोचे काम असेल. तसेच मुंबईतील इतर कामं असतील ही सर्व कामे जोमाने झाली'', असं ते यावेळी म्हणाले.

Eknath Shinde :
Politics : जखमी असतानाही धनंजय मुंडे पक्षासाठी मैदानात; म्हणाले, 'राह मे खतरे कितने भी हो...'

''राज्याच्या विकासावर चर्चा झाली पाहिजे. विचारधारेने पुढे गेले पाहिजे. तसेच मागील अडीच वर्षात काय काम झालं?'', असं म्हणत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच 'पुढच्या दोन वर्षात मुंबईत (Mumbai) एक देखील खड्डा दिसणार नाही. मुंबईमध्ये जगभरातील लोकं येतात. मुंबई फायनान्शिअल हब आहे. त्यामुळे मुंबई जशी आहे, तशी लोकांना देण्याचे काम आम्ही करतो आहोत'', असंही ते यावेळी म्हणाले.

Eknath Shinde :
Aurangabad News : पाणी योजनेचे ग्रहण सुटेना, प्रशासकीय मान्यता नसल्याने निविदा रखडली..

''आम्ही मुंबईकरांना आगामी दोन वर्षात खड्डेमुक्त रस्ते देणार आहोत. सध्या मुंबईत ४०० किमी सीसी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात आणखी ४०० किमीचे खड्डेमुक्त रस्ते मुंबईकरांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com