ANIL DESHMUKH NEWS Sarkarnama
मुंबई

Video Samit Kadam: निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाचा पलटवार; अनिल देशमुखाचं सगळचं खोडून काढलं!

Samit Kadam new claim Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh Controversy: तीन वर्षानंतर त्यांना हा विषय सूचला आहे, त्यांना काय नरेटिव्ह सेट करायचे हे त्यांनाच माहीत आहे. देशमुखांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना अशी चर्चा करणे चुकीचे आहे.

Mangesh Mahale

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वादात चर्चेल आलेला समित कदम याने देशमुख यांच्याबाबत मोठा गौप्य़स्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागल्याची शक्यता नाकारता येत नाही.

फडणवीसांना माझ्याकडे समित कदमला पाठवले होते, असे देशमुख यांनी सांगितले. समित यांचा फडणवीसांशी संबध आहे. याबाबतचे काही फोटो देशमुख यांनी आज माध्यमांना दाखवले. त्यानंतर समित कदम याने देशमुखांच्या आरोपांचे खंडन केले आहे.

"अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे त्यांनी बोलावल्या शिवाय मी जाऊ शकत नाही. त्यांनी बोलावल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो. गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून माझ्या अडचणीत काही मदत करा, अशी विनंती त्यांनी माझ्याकडे केली," असा गौप्यस्फोट समित कदम यांने केला आहे.

देशमुख यांनी मला बोलावल्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होतो. फडणवीस यांच्या सांगण्यावरुन मी त्यांच्याकडे गेलो, असे बोलले जाते. पण फडणवीसांचा या प्रकरणाशी कुठलाही संबध नाही. तीन वर्षानंतर त्यांना हा विषय सूचला आहे, त्यांना काय नरेटिव्ह सेट करायचे हे त्यांनाच माहीत आहे. देशमुखांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना अशी चर्चा करणे चुकीचे आहे, असे समित म्हणाला.

समित कदम काय म्हणाला..

  • अनिल देशमुखांचे डोके फिरले आहे. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही

  • मी देवेंद्र फडणवीस यांच्या आधीपासून अनिल देशमुखांना ओळखतो.

  • भाजपा घटक पक्षात दाखल होण्याआधी पासून देशमुखांना ओळखतो.

  • मी एक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मला सगळे राजकीय नेते ओळखतात..

  • अनिल देशमुख यांच्याकडे मी कोणताही लिफाफा घेऊन गेलो नाही,

  • एकचं फोटो दाखवून निवडणुकांच्या तोंडावर फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

  • संजय राऊत यांच्याबद्दल बोलण्यासारखं नाही,अनिल देशमुखांनंतर पुढचा टप्पा तो आहे..

  • माझे फोटो फेसबुकवर आहेत, ते जग जाहीर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT