Sanjay Raut:...म्हणून मी फडणवीसांना खलनायक म्हणतो, समित कदम याचा RSS अन् फडणवीसांशी संबंध

Anil Dekmukh Case :जर तुम्ही सह्या केल्या नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, असा इशारा देण्याचा प्रयत्न त्याने फडणवीसांच्यावतीने केला होता, असे राऊत म्हणाले.
Samit Kadam news
Samit Kadam newsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Dekmukh) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीस यांच्याकडून ऑफर होती, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.

समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता, असेही देशमुख यांनी म्हटलं आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समित कदमचा आरएसएस आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी संबंध असल्याचा दावा केला आहे.

समित कदम हा फडणवीस यांच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार भेटत होता. अजित पवार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा. तीन एफीडेव्हीटवर तुम्ही सह्या, पुढचं आम्ही पाहतो. जर तुम्ही सह्या केल्या नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, असा इशारा देण्याचा प्रयत्न त्याने फडणवीसांच्यावतीने केला होता, असे राऊत म्हणाले.

मी फडणवीसांना वारंवार खलनायक म्हणतो. आमच्यासारखे राजकीय दबावाला जे झुकले नाही ते तुरुंगात गेले.जे झुकले व घाबरले ते भाजपात गेले, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Samit Kadam news
Milind More: धक्कादायक: टोळक्याच्या हल्ल्यात ठाणे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा मृत्यू

फडणवीस आणि टोळी सांगत आहे की आमचा काही संबंध नाही. समित हा मिरजेतील असून त्याचा भाजप आणि RSS बरोबर संबंध आहे. समित कदम कोण आहे ? त्याला Y दर्जाची सेक्युरिटी कोणी दिली ? त्याने असे काय कर्तव्य बजावलं आहे, असे अनेक प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या आरोपांबाबत राऊत म्हणाले की अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे. मी आरोप म्हणणार नाही तर खुलासा म्हणेल. कारण आरोप हवेत होत असतात. अनिल देशमुख यांच्या बोलण्यात तथ्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com