Devendra Fadnavis On Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरेंची निवडणूक आयोगावर आरोपांची सरबत्ती, फडणवीसांचं काही मिनिटांतच प्रत्युत्तर; म्हणाले...

Lok Sabha Election 2024 Voting : उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर केलेल्या टीकेला काही वेळातच भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. मुंबईतील संथ गतीच्या मतदानाबद्दल सर्वप्रथम आम्हीच तक्रार केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Jagdish Pansare

Mumbai News : मुंबईमध्ये मतदानावेळी अडथळे येत असून संथगतीने मतदान होत आहे. उद्धव ठाकरेंनी यावर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि भाजपला सुनावले आहे. ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळातच उद्धव ठाकरे यांचे रडगाणे सुरू झाले, असे प्रत्युत्तर दिले.

मुंबईत सथंगतीने मतदान सुरू आहे. मतदान केंद्रावर गैरसोय झाल्याच्या तक्रार मतदारांनी केल्या. कुठे ईव्हीएममध्ये बिघाड तर, कुठे मतदारांची मतदार यादीतून नावे गायब आहेत. याशिवाय मतदारांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा न पुरवल्यामुळे मतदारांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी यावर पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. मतदान संथ गतीने व्हावे, असे प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला काही वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबईत सुरू असलेल्या संथ गतीच्या मतदानाबद्दल सर्वप्रथम आम्हीच तक्रार केली. उद्धव ठाकरे यांनी आता रडगाणे सुरू केले आहे. मुंबईत संथ गतीने मतदान होत आहे. याबाबत भाजपने निवडणूक आयोगाचे तक्रार करत लक्ष वेधले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी रडगाणे सुरू केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे नरेंद्र मोदीजींवर Narendra Modi आरोप करण्यास प्रारंभ केला आहे. चार जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईकरांना देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन करत मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT