Maharashtra Politics : अमित शहांच्या मर्जीतील भाजप नेत्याचे मोठे भाकित; ‘विधानसभेला कदाचित वेगळं चित्र असूही शकतं’

Assembly Election prediction : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्याचे आम्ही जे विश्लेषण केले आहे, त्यानुसार एनडीए ‘चारशे पार’ चा आकडा नक्की पार करेल, असा दावा तावडे यांनी केला. इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या दाव्यावर बोलताना तावडे म्हणाले, त्यांनी तसा दावा केला नाही तर त्यांना पोलिंग एजंटही मिळणार नाहीत. त्यांनी दावा करणे स्वाभाविक आहे.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 May : मुंबईकर हे आज नरेंद्र मोदींसाठीच मतदान करत आहेत. मतदान केलेल्या दहापैकी आठ लोकही तेच (आम्ही मोदींसाठी मतदान केले) बोलतात. विधानसभेला लोकांच्या मनात कदाचित वेगळं चित्र असूही शकतं. मला माहित नाही की, त्यावेळी काय चित्र असेल. पण, आजतरी मोदींसाठी मतदान होत आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.

विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मुंबईतील ()Mumbai पार्ले विभागातील साठे महाविद्यालयातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जिंकेल, असा दावा केला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तावडे यांनी हे विधान केले. तावडे हे बोलण्याच्या ओघात बोलून गेले. पण त्याचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळातून काढले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinod Tawde
Onion Export Ban Issue : कांदा भाजपची पाठ सोडेना...माढ्यापासून व्हाया शिरूर, बागलाण, सटाण्यापर्यंत राग कायम!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्याचे आम्ही जे विश्लेषण केले आहे, त्यानुसार एनडीए ‘चारशे पार’ चा आकडा नक्की पार करेल, असा दावा तावडे यांनी केला. इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या दाव्यावर बोलताना तावडे म्हणाले, त्यांनी तसा दावा केला नाही तर त्यांना पोलिंग एजंटही मिळणार नाहीत. त्यांनी दावा करणे स्वाभाविक आहे.

तावडे म्हणाले, संजय राऊत ज्येष्ठ नेते, खासदार आणि एका दैनिकाचे संपादक आहेत. त्यांनी तर आपला तोल ढळू दिला नाही पाहिजे. एकट्या उद्धव ठाकरेंची रांगेत उभे राहून मतदान केले नाही तर नरेंद्र मोदी, शरद पवारही रांगेत उभे होते. लोकशाहीचे एक वैशिष्ट्य आहे की, कोणी कितीही मोठा असला तरी सगळ्यांच्या मताची किमत सारखीच आहे.

Vinod Tawde
Gandhi-Yadav Prayagraj Rally : गर्दीच्या अतिउत्साहाचे करायचे काय? नेते, कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी मतदान होत आहे, त्यामुळे लोक कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातील, असं वाटत असताना मतदार मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी येत आहेत, हे चित्र पाहून मला समाधान वाटले. मला स्वतःला चाळीस मिनिटे रांगेत उभं राहावं लागलं. हे चांगलं आहे. कारण सुरक्षित आणि विकसित भारतासाठी लोक मतदानाला बाहेर पडले आहेत, असे मला वाटतं, असेही तावडे यांनी नमूद केले.

Vinod Tawde
Thackeray Voting to Congress : उद्धव ठाकरेंनी आघाडीधर्म निभावला; प्रथमच केले काँग्रेसला मतदान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com