Dhananjay Munde, Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Dhananjay Munde : आता कुणीही भुरट्यांनी अजितदादांवर बोलावं का ? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांवर प्रहार

Jitendra Awhad : ठाण्यातील नेते कुणामुळे सोडून गेले ?

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळचे नेतृत्वाचा लोकशाही टिकवण्यावर भर होता. मात्र, पक्षातील लोकशाहीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेताच त्यांना खलनायक ठरवण्यात त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. काही भुरट्यांनी तर अजितदादांना पळपटे, भेकड म्हणाले. आम्ही धावलो नसतो तर ते आजही तुरुंगातच असते, असा प्रहार कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी नाव न घेता माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे रायगडमधील कर्जत येथे गुरुवारी वैचारिक मंथन शिबिर पार पडले. या वेळी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत आपल्या स्टाइलमध्ये समाचार घेतला. संबंधितांना कडक शब्दांत सुनावत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचे ठणकावून सांगितले. यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, आपले एकेकाळचे नेतृत्व सांगत होते, की लोकशाही टिकली पाहिजे. मग ती पक्षातील असो, देशातील असो. आपल्या तत्कालीन नेत्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतले, त्यावेळी मात्र सर्वांनी सोबत असल्याची भावना होती. मात्र, पक्षातील लोकशाहीसाठी अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली, की ते खलनायक कसे ठरले. पक्षाने घेतलेल्या निर्णयात बदनाम कोण, खलनायक कोण तर दादा! आता त्यांच्यावर कुणी भुरट्यांनी बोलावे का ?, असे म्हणत मुंडेंनी आव्हाडांना आपल्या टप्प्यात घेतले.

ठाण्यातील घटनाक्रमावर बोलताना मुंडेंना सांगितले, आमचं ठाण्याचं... दादा मायच्यानं सांगतो असा प्रसंग आला होता की तुम्ही मला चार्टर घेऊन तटकरेंसोबत पाठवले नसते, तर कदाचित हा व्यक्ती आजही बाहेर निघू शकला नसता. त्याने तुम्हाला पळपुटा म्हणावं, भेकड म्हणावं. त्यावेळी तो इतका भिला होता, की एेनवेळी आम्हाला चार्टर घेऊन जावं लागलं, असे म्हणत मुंडेंनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली.

ठाण्यातील नेते आव्हाडांमुळे सोडून गेल्याचा आरोपही मुंडेंनी या वेळी केला. ते म्हणाले, कुणाला कंटाळून गणेश नाईकांनी पक्ष सोडला. निरंजन डावखरेंवर बाहेर पडण्याची वेळी कुणी आणली. असे अनेक जण आहेत. आज स्वर्गीय आबा असते तर सांगलीत कुणाचा कसा त्रास आहे ? आता या बाजूही सांगितल्या पाहिजेत, असे सांगत मुंडेंनी आव्हाड, जयंत पाटलांची कोंडी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT