Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या निशाण्यावर शरद पवार; म्हणाले, 'त्यांच्यासाठी केले तर ठीक, नाहीतर...'

NCP Ajit Pawar Group : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाऊल उचलले तर खलनायक ठरले
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हुकूमशहा पद्धतीने कारभार चालवला जात होता, असा आरोप बंडखोर अजित पवार गटाने वारंवार केला आहे. याचा कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी पुनरुच्चार करताना नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवारांवर निशाणा साधला. स्वतःच्या राजकारणासाठी आपल्या नेत्यांचा वारंवार बळी देणारे लोकशाहीवर भाष्य करत होते. मात्र, पक्षातील लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय घेणाऱ्यांना खलनायक ठरवण्यात येते, असे म्हणत मुंडेंनी पवारांना लक्ष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा रायगडमधील कर्जत येथे गुरुवारी वैचारिक मंथन शिबिर पार पडले. या वेळी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना आपल्या स्टाइलमध्ये समाचार घेतला. या वेळी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र, संबंधितांना कडक शब्दांत सुनावत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचे ठणकावून सांगितले. मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

Dhananjay Munde
Chhattisgarh Exit Polls: छत्तीसगडमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत; भाजपचं सत्तेचं स्वप्नं भंगणार !

शरद पवारांवर बोलताना (Dhananjay Munde) मुंडे म्हणाले, 'आपले एकेकाळचे नेतृत्व सांगत होते की लोकशाही टिकली पाहिजे; मग ती पक्षातील असो, राज्यातील किंवा देशातील असो. मात्र, खऱ्या अर्थाने पक्षातील लोकशाही टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाऊल उचलले तर त्यांना खलनायक ठरवण्यात आले. आपल्या तत्कालीन नेत्याने स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतले, त्यावेळी मात्र सर्वांनी सोबत असल्याची भावना होती. मात्र, पक्षातील लोकशाहीसाठी अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ते खलनायक कसे ठरले.'

आता मागे हटायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत मुंडेंनी आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचे संकेत दिले. 'आपण वेगळी भूमिका घेतली म्हणून बॅकफूटवर जाण्याची काही गरज नाही. आपले नेतृत्व धाडसी असल्याने भिण्याचे कारण नाही. त्यांच्याकडे ना राष्ट्रवादी आहे ना घड्याळ राहणार, हे त्यांनाही कळाले आहे. हे कुणी नवीन सांगायची गरज नाही. शेवटी लोकशाही मानावीच लागते. या मंथनातून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे,' असा निर्धार करत धनंजय मुंडेंनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला.

(Edited by Sunil Dhumal)

Dhananjay Munde
MNS Marathi Politics : सुस्त मनसेला नाशिकमध्ये मिळाला मराठीचा मुद्दा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com