Dhananjay Munde And Ajit Pawar .jpg Sarkarnama
मुंबई

Dhananjay Munde News : धनंजय मुुंडे अचानक 'देवगिरी'वर दाखल; अजितदादा अन् पटेलांसोबत तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या बैठकीत मोठा निर्णय?

NCP Political Update : काही दिवसांपूर्वीच कौटुंबिक न्यायालयानं झटका दिल्यानंतर आता मुंडेंना परळी कोर्टानेही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. यामुळे त्यांचा पाय आणखी खोलात बोललं जात आहे. अशातच धनंजय मुंडेंबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले आहे.या प्रकरणात गंभीर आरोप केले जात असल्यामुळे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवरही (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोरही दिवसागणिक वाढला आहे. काही दिवसांपूर्वी कौटुंबिक न्यायालयानं झटका दिल्यानंतर आता मुंडेंना परळी कोर्टानेही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. यामुळे त्यांचा पाय आणखी खोलात बोललं जात आहे. अशातच धनंजय मुंडेंबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे अचानक उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या (Ajit Pawar) मुंबईतील देवगिरी बंगल्यावर गुरुवारी (ता.13) दाखल झाले होते. त्यामुळे ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरात सुरू होती. मुंडे हे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास देवगिरीवर दाखल झाले आहेत.

यावेळी तिथे अजित पवारांसोबतच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल हेही सोबत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंबाबत पक्षाच्या हितासाठी निर्णय घेणार असल्याचं बोललं जात होतं. याचमुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून अजित पवारांसोबतच्या भेटीबाबत खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये ही भेट शासकीय आणि पक्षीय कामकाजासंदर्भात होती असं स्पष्ट करण्यात आलं आहे. जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीला प्रफुल पटेलही उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात मुंडेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या माहिती पत्रात खरी माहिती दडवल्याची तक्रार दाखल केली होती.याच तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.एकीकडे राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेली कित्येक दिवसांपासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन पध्दतीनं तक्रार दाखल केली होती.कोर्टाने दिलेल्या कारणे दाखवाच्या नोटिशीवर येत्या 24 फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. परंतु, करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्र पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरूनच न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.

करुणा मुंडे यांधनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा मुंडे यांच्या नावाच्या मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. या आरोपाखाली हा अर्ज करण्यात आला होता. यावरच न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका देतानाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT