Dhananjay Munde, Karuna Sharma Sarkarnama
मुंबई

Seeshiv Munde News : धनंजय मुंडेंसाठी मुलगा सिशिव मैदानात; आई करुणा मुंडेंवर गंभीर आरोप

Dhananjay Munde Karuna Munde Vandre Family Court : वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना दिले आहेत.

Rajanand More

Mumbai News : वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने गुरूवारी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका दिला. कोर्टाने करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतरिम निकाल देताना पोटगीला मान्यता दिली आहे. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले. पण आता धनंजय मुंडेंसाठी मुलगा सिशिव मैदानात उतरला आहे.

सिशिव मुंडे याने सोशल मीडियात पोस्ट करत आई करुणा मुंडेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता करुणा मुंडे यांच्या अनेक दाव्यांमध्ये ट्विस्ट आला आहे. सिशिव हा सध्या करुणा मुंडे यांच्यासोबतच राहतो. त्यानंतरही त्याने सोशल मीडियातून वडिलांची बाजू घेत आईवर टीका केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

काय म्हटले आहे सिशिवने?

सिशिवने सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी सिशिव धनंजय मुंडे, आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचे साधन बनवण्यात आल्याने मी बोलत आहे. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी आईएवढे वाईट नाहीत. आमची आई आम्हालाच वाईट पध्दतीने त्रास द्यायची. माझी आई छळाचा जो दावा करते, तसाच तिने आमचाही केला. माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिलं आहे.

माझ्या आईने वडिलांना मारहाण केल्यानंतर ते निघून गेले. आम्हालाही जायला सांगितले. 2020 पासून वडील आमची काळजी घेत आहेत. मी, माझी बहीण आणि धनंजय मुंडेंचा आईने छळ केला. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. माझ्या आईने गृहकर्ज मुद्दाम थकवले. वडिलांवर सूड उगवण्यासाठी ती बनवा रचते, असा दावा सिविशने केला आहे.

कोर्टाने काय आदेश दिले?

करुणा मुंडे यांनी वांद्रे कोर्टात धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत याचिका दाखल केली आहे. त्यावर आज कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाने या केसचा अंतिम निकाल लागेपर्यंत करुणा मुंडे यांना त्रास देऊ नये, असे निर्देशही कोर्टाने धनंजय मुंडेंना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT