Balaji Tandle-Dhananjay Munde Sarkarnama
मुंबई

Anjali Damania : ‘तू जास्त बोलल्यामुळे मला त्रास होतोय, धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर भडकलेत’; तीन मोबाईलवरून मुंडे आरोपींना मेसेज पाठवायचे’

Santosh Deshmukh Murder Case : बालाजी तांदळे याने देशमुख कुटुंबीयांना स्वतः सांगितले आहे की, पोलिसांनी या आरोपींना शोधलेलेच नाही. आम्ही आमच्या गाड्या फिरवून या आरोपींचा शोध घेतला आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 10 March : संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी पळून गेल्यानंतर त्यांना शोधून नेण्याचे आणि इतर सर्व गोष्टींचे सूत्रधार हे धनंजय मुंडेच होते. मुंडेंच्या मोबाईलवरूनच बालाजी तांदळे, शिवलिंग बोराळे, सारंग आंधळे या सर्वांना मेसेज पाठविण्याचे कामही होत होतं. त्यांच्याकडे तीन मोबाईल फोन होते. त्या तीन फोनच्या माध्यमातून ते सर्वांशी संपर्कात होते. बालाजी तांदळेंने स्वतः देशमुख कुटुंबीयांना सांगितले की, हे सर्व आरोपी पोलिसांनी पकडले नाही, तर आम्ही आमच्या गाड्या घेऊन त्यांना शोधले. मात्र, आता मुंडे हे बालाजी तांदळेवर चांगलेच भडकले असून तू जास्त बोलल्यामुळे मला त्रास होतोय, असेही त्यांनी तांदळेला सुनावले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

दमानिया म्हणाल्या, संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच सर्व काही करत होते. शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की, तू वाल्मीक कराडला घे आणि सीआयडीच्या ऑफीसमध्ये सोड. आरोपींना पकडण्यासाठी बालाजी तांदळेलाही पोलिसांबरोबर फिरायला सांगण्यात आलं होतं. त्यातूनच नऊ तारखेपासून बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर आरोपींचा शोध घेत होता. देशमुख खूनप्रकरण जसं तापायला लागलं तसं त्याचे धागेदोरे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंंडेंपर्यंत येऊ नयेत, यासाठी बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं. इतर आरोपींना तिथल्या तिथं अटक करून हे प्रकरण मिटवा, त्यासाठी मुंडे प्रयत्न करत होते.

पोलिसांनी बालाजी तांदळेला लिहिलेला लेटर दाखवत अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, हे लेटर पंधरा तारखेचे आहे. म्हणजेच बालाजी तांदळे हा पहिल्या दिवसांपासून म्हणजे नऊ तारखेपासूनच पोलिसांबरोबर फिरत होता. मात्र, त्यांना पंधरा तारखेला लेटर देण्यात आलं होतं. कोणते पोलिस आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतात की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण आरोपींचा शोध घेऊ. पण, या प्रकरणात मुंडे यांचा पोलिसांवर दबाव होता, असेही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.

त्या म्हणाल्या, बालाजी तांदळे याने देशमुख कुटुंबीयांना स्वतः सांगितले आहे की, पोलिसांनी या आरोपींना शोधलेलेच नाही. आम्ही आमच्या गाड्या फिरवून या आरोपींचा शोध घेतला. म्हणजे हे प्रकरण त्यांच्यावर म्हणजेच इतर आरोपींवर शेकलं जावं आणि त्यांच्यापर्यंत येऊ नये, अशी मुंडे यांची रणनीती होती.

मला मिळालेली ही माहिती खरी असून धनंजय देशमुख यांच्या एका नातेवाईकाने रिकन्मर्फ केली आहे. तांदळे याने स्वतः धनंजय मुंडेंना सांगितली आहे. बालाजी तांदळेंवर धनंजय मुंडे आता चांगलेच भडकले आहेत, ते म्हणतात की तू जास्त बोलला; म्हणूनच मला त्रास होतोय, असा दावाही अंजली दमानिया यांनी केली.

या प्रकरणात सर्वांना सहआरोपी करावे. पोलिसांची मदत आरोपींना होती. राजेश पाटील, महाजन, एलसीबीचे अधिकारी गीते, या कोणाचेही स्टेटमेंट या दोषारोपपत्रात नाही. एलसीबीच्या गीतेंनी या टोळीला पूर्ण मदत केली होती. त्यांना या घटनेची संपूर्ण माहिती होती. संतोष देशमुख यांना उचलून नेले होते, त्याची संपूर्ण माहिती गीते यांना होती. त्यामुळे धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायवसे आणि त्यांच्या पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय भागवत शेलार, एलसीबीचे अधिकरी गीते या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी दमानिया यांनी केली.

त्या बैठकीला दोन पोलिस अधिकारी उपस्थित होते : अंजली दमानिया

अवाधा कंपनीच्या संदर्भात सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली होती. त्या बैठकीला हे सर्व आरोपी आणि दोन पोलिस अधिकारीही उपस्थित होते. मा या सर्व माहितीचा चार्जशीटमध्ये उल्लेख नाही. त्यामुळे मुख्यमंत्री हे धनंजय मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे का, अशीच सर्व परिस्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणतात की जेव्हा त्यांचा संदर्भ येईल, तेव्हा आम्ही कारवाई करू. पण त्या दिशेने काम सुरू झालेच नाही, तर ते पुढे कसे येणार आहेत, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT