Santosh Deshmukh Murder Case : धनंजय देशमुखांचा 'तो' खळबळजनक दावा; अंजली दमानिया म्हणाल्या, 'काय वाटेल ते आरोप करतील, पण...'

Anjali Damania Dhananjay Deshmukh murder Beed Santosh Deshmukh : धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधांच्या आरोप करणार होते, या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया.
Anjali Damania 1
Anjali Damania 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या तपासात बीड पोलिसांकडून कोणतेही खुलासे होत नाहीत. यावर त्यांचे बंधू धनंजय देशमुख नाराज आहेत.

याच दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्येला अनैतिक संबंधांचा अँगल देण्याची तयारी काहींनी चालवल्याचा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, "धनंजय देशमुख यांचा हा आरोप ऐकून धक्काच बसला. हे खरंचं आहे, हे कुठच्याही लिमिटला जातील, काय वाटेल ते आरोप करतील, वाटेल ते! त्यांना कसंही करून वाचवायचे आहे".

Anjali Damania 1
Santosh Deshmukh Murder Case : ...तरच धनंजय मुंडेंचा अँगल बाहेर येईल; अंजली दमानियांच्या दाव्यानं खळबळ

याशिवाय अंजली दमानिया यांनी पोलिसांच्या (Police) तपासावर प्रश्न उपस्थित केले. नऊ तारखेला स्कार्पिओमध्ये सापडलेल्या दोन मोबाईलचे काय झाले? त्यांचे सीडीआर बाहेर का आला नाही? डेटा रिकव्हरचे काय झाले? अडीच महिने झाले, तरी डेटा रिकव्हर झालेला नाही? 24 तासात फोर लेव्हलपर्यंत गेलेला डेटा रिकव्हर करता येतो, मग त्याचे काय झाले? असे प्रश्न उपस्थित केले.

Anjali Damania 1
Anjali Damania : पूर्वी 342 कोटींचा, आता नवीन 200 कोटींचा, मंत्री मुंडेंचा आणखी एक घोटाळा; अंजली दमानिया म्हणाल्या, 'आता वाचूच शकत नाही'

अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषिमंत्री असताना केलेला आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड केले. हा घोटाळा 200 कोटींचा असून, यासाठी खोटा अध्यादेश काढल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी मंत्री मुंडेवर 342 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता आणखी एक घोटाळ्याचा आरोप केल्याने मंत्री मुंडे आणखी अडचणीत आले आहे. अर्थातच, मंत्री मुंडेंनी या घोटाळ्याचे आरोप देखील फेटाळले आहेत.

मंत्री मुंडेंचा लवकरच तिसरा घोटाळा...

दरम्यान अंजली दमानिया यांनी आणखी तिसऱ्या घोटाळ्याचा गौप्यस्फोट पुढील तीन दिवसांनी करणार असल्याचा इशारा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे जाणं का गरजेचे आहे, एक मंत्री जो आपल्या पदाचा गैरवापर करून, अमाप संपत्ती कमवतो, लुटतो, वाल्मिक कराडसारखी माणसं ठेवतो. जी दहशत पसरवितात. त्याच्यामुळे ही हत्या झाली. ही महाराष्ट्रात पुन्हा घडू नये, म्हणून या मंत्र्यांना अद्दल घडावी, यासाठी आपला लढा सुरू राहणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com